चंद्रपूर सुपर थर्मल पाॅवर स्टेशनमध्ये लागली भीषण आग !



चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन मध्ये आज रविवार दिनांक 2 मे रोजी रात्रौ अकरा वाजता दरम्यान भिषण आग लागली असून आज रविवार सुट्टीचा दिवस व कोरोनामुळे असलेले निर्बंध यामुळे कामगारांची संख्या कमी असल्याचे कळते. वृत्त लिहीस्तोवर जिवीतहानी व वित्तहानी झाल्याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. आगीची भीषणता बघता मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संबंधात मुख्य अभियंता पंकज सपाटे यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी चंद्रपूर सुपर थर्मल पाॅवर स्टेशनमधील बॉयलर क्र. 8व 9 मधील मेन्टेनन्स मधील केबल (बेल्ट)बंद झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले व त्यामुळेच आग लागली असून आज मोठ्या प्रमाणात हवा असल्यामुळे याआगीची भीषणता वाढली अशी माहिती त्यांनी दिली. नुकतेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्रो 11 च्या सुमारास ही आग लागली असून यावेळी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती मिळाली.

युट्यूब वरील बातम्यांसाठी सबस्क्राईब करा

https://youtu.be/lt_wl0MV--8