१२ तासांच्या आत झाली DNR वर कारवाई !




चंद्रपूर : गुरूवार दि. 29 एप्रिल रोजी RM media centre ने स्क्रीन अॉपरेशन करून DNR travels ज्यादा दर आकारून नियमांचे उल्लंघन करत प्रवासी वाहतूक करीत आहे याचे पुराव्यानिशी वृत्त प्रकाशित केले होते. यासंदर्भात यासंदर्भात चंद्रपूरची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांना माहिती दिली. अवघ्या बारा तासात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी चंद्रपूर येथून पुण्याला प्रवासी वाहतूक करताना DNR travels वर रंगेहात कारवाई केली. कलम 66/192 अंतर्गत परवाना शर्ती चे उल्लंघन, कोविड 19 नियमावली उल्लघन करित असतांना dnr ऑफिस जवळ, DNR travels चे वाहन क्र. MH 34 BH 8377 चंद्रपूर येथे तपासणी करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करण्यात आले आहे. अवघ्या बारा तासात करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, काल RM media centre ने "चंद्रपूरात DNR कडून नियमांची खुलेआम उडवली जात आहेत धज्जीया !" या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याबद्दलचे पुरावे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सादर केल्यानंतर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आज 30 एप्रिल रोजी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी मोरे यांनी प्रत्यक्षरीत्या DNR travels वर कारवाई केली. कोविड-19 घ्या पार्श्वभूमीवर शासनाने दिशा निर्देश केले आहेत. या दिशा-निर्देशांचे उल्लंघन DNR travels यासाठी यापूर्वीही या ट्रॅव्हल्स कंपनीला दोनदा मेमो देण्यात आल्या असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते. वृत्ताची दखल घेत करण्यात आलेली कारवाई ही अभिनंदनीय आहे. कोविड-19 शासन निर्देशांचे पालन करणे ही फक्त सर्वसामान्यांची जबाबदारी नसून ते सगळ्यांचे कर्तव्य आहे. परंतु काही गैर प्रवृत्ती सरेआमपणे या नियमांना पाठ दाखवित आहे. अशा गैरप्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्याचे काम त्या-त्या विभागाचे आहे, ते कर्तव्य प्रामाणिकपणे बजवायलाचं हवे, जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग या ठिकाणी यशस्वी झाला आहे.


जिल्ह्यात येणाऱ्या दारूवर पोलीस विभाग कधी करेल कारवाई ?
लॉकडाऊननंतर चंद्रपूरमध्ये मागील काही दिवसापासून दारूच्या पुरवठा होत आहे. या विषयाच्या अनुषंगाने RM media centre ने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देत वृत्त ही प्रकाशित केले आहे. जिल्हा परिवहन विभागाने आपल्या कर्तव्याच्या परिचय देत जशी कारवाई केली तशीच कारवाई जिल्हा पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर करावी अशी अपेक्षा जिल्हावासीयांना आहे. येणाऱ्या वेळेत जिल्हा पोलीस विभाग यासाठी किती सक्षम आहे, हे नागरिकांना कळणारचं आहे. RM media centre याबाबत पाठपुरावा व पाठलाग करीत राहणार आहे.