▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

धनगर समाज कर्मचारी संघाची सभाधनगर समाज शासकिय / अर्धशासकिय कर्मचारी सोसायटी राजुरा येथे मल्हारश्री संजय चिडे यांच्या अध्यक्षेखाली राजुरा धनगर कर्मचारी संघाची सभा घेण्यात आली.सभेला जिल्हाध्यक्ष प्रविण बुच्चे ,प्रमुख पाहुणे गावंडे सर ,बुच्चे सर ,धवने सर व सर्व शासकिय विभागातील उपस्थित कर्मचारी वृद्धांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.सभेचे प्रास्ताविक तथा संघटन तयार करण्याचे उदिष्ट प्रविण बुच्चे यांनी स्पष्ट करुन उपस्थित मंडळींना समजावून दिले.प्रत्येक समाजबांधवांनी मोकळ्या व्यासपीठावर खुली चर्चा करुन आपआपले मनोगत व्यक्त करुन सर्वसमावेशक अशी संघटन शक्ती तयार करण्यासाठी सर्वानी एकमताने सहमती दर्शवून कार्यकारणी गठित करण्यात आली.राजूराच्या शाखेच्या अध्यक्षपदी रामकिसन चिडे ,कार्याध्यक्ष बालाजी नंदगावे ,सचिव दशरथ धवने ,सहसचिव शेखर तेलंग (महसुल ) ,तालुका प्रमुख संघटक सुरेंद्र चिडे(महसुल), संजय गावंडे (बांधकाम विभाग) ,दिनेश पोतले( परि.महामंडळ ) ,मधुकर गाडगे ( तालुका प्रमुख संघटक) तालुका महिला प्रतिनिधी - वनिता उराडे, र्दोपती पोतले ,प्रनिता बुच्चे ( आरोग्य ) , माधुरी मसाडे ( पं.स.) अशाप्रकारे निवड करून सदस्यानी अनुमोदन दिले.संजय चिडे यांनी अध्यक्षीय भाषणातून निवड झालेल्या सर्व पदाधिकारी पुढील संघटन वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.सभेला सर्व विभागातील कर्मचारी बांधव उपस्थित होते.