▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455 ▪️ RNI No. MAHMAR/2011/37424/

बोरडा दीक्षित येथील समाजगृहाला स्व.मा.सा.कन्नमवार यांचे नाव देण्याची विविध सामाजिक संघटनांची मागणी...चंद्रपूर 28जानेवारी
अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघ, विदर्भ बेलदार, तत्सम समाज संघटना चंद्रपूर जिल्हा बेलदार समाज संघटना व दादासाहेब कन्नमवार प्रतिष्ठान चंद्रपूर द्वारे एक शिष्टमंडळ द्वारे
पोंभूर्णा तालुक्यातील बोरडा बोरकर गट ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर दीक्षित या गावात 25.11.2019 ला गावातील नवीन सभागृहाला स्व.दादासाहेब कन्नमवार सभागृह असे नाव देण्याचे ग्रामसभेच्या ठराव सर्वानुमते मंजूर करून घोषित करण्यात आले त्यानुसार गावातील कार्यकर्त्यांनी तसे सभागृहाला नाव दिले .परंतु काही लोकांनी विरोध केले म्हणून खुद पोंभूरणा येतील ठाणेदार यांनी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांना दबावात आणून जुना ठराव रद्द करून नवीन ठराव लिहिण्यास बध्य केले वसभगृहावरील नाव पुसण्यासाठी बेकायदेशीर निर्णय घेण्यास लावणारे पोलिस अधिकारी वर कडक करून पुन्हा सदर सभागृहाला दादासाहेब कन्नमवार सभागृह असे नाव द्यावे अशाषयाचे निवेदन मान. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर व मान. जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रपूर व मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपूर यांना एका शिष्ठ मंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.
सदर. शिष्टंडळात श्री.आनंदराव अंगलवार.अनिल बोरगमवार, चंद्रशेखर कोटेवार, विजय बोरगमवार , विजय पोहनकर धनराज दुर्वे, सूर्यनारायण बत्तुलवार, दिलीप गद्दमवार, अशोक पेंचलवार, मनिष कन्नमवार, सचिन चलकलवार इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते