▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

पोलिस अधिक्षक डॉ. रेड्डी यांची बदली झाल्याची फक्त अफवा



चंद्रपुर चे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची नाशिक येथे बदली झाली असल्याच्या अफवांच्या बातम्या सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत. अद्याप असा आदेश आलेला नसून या फक्त अफवा आहेत, याला डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यानंतर आता पोलीस अधीक्षक यांची बदली होणार या चर्चेला उधान आले होते. मागील दोन दिवसांपासून सोशल माध्यमांवर नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी चंद्रपूरचे डॉक्टर रेड्डी यांची बदली झाल्या असल्याचे वृत्त झळकु लागले. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थिती बघता पोलीस अधीक्षकांच्या बदलीला काही दिवसांसाठी स्थगिती मिळावी असे जनसामान्यांमध्ये बोलल्या जात आहे. अधिकाऱ्यांची बदली होणे हा कार्यप्रणालीचा एक भाग असतो. काही अधिकारी आपल्या कर्तुत्वाने सामान्यांवर एक वेगळी छाप सोडून जातात त्यामुळे त्यांची बदली सामान्यांना दुखावणारी असते, असाच काहीसा अनुभव चंद्रपूर जिल्हावासियांना यापूर्वी आलेला आहे. दोन दिवसापासून पोलीस अधीक्षक त्यांची बदली झाली असल्याच्या बातम्या या अफवा असून डॉ. माहेश्वर रेड्डी यांची बदली झाली नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.