▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोपरांत भारतरत्न दया



अण्णाभाऊ साठे हे भारतीयच नव्हे तर जागतिक साहित्य क्षेत्रातिल एक अग्रगण्य नाव आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असो की गोवा मुक्ति संग्राम अश्या अनेक आंदोलनात अण्णाभाऊनी आपल्या शाहीरी कलेच्या व प्रबोधनाच्या माध्यमातुन नवराष्ट्राच्या निर्मितिसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
आयुष्यभर हालअपेष्ठा सहन करीत जगलेले जीवन शब्दबद्ध करीत असताना अण्णाभाऊनी कामगार,दिन,दलित,शोषित, वंचित,पीडित समाजाच्या व्यथा,वेदना आपल्या साहित्यातून अतिशय प्रखरपने मांडल्या आहेत. जगातील बऱ्याच विद्यापीठाने त्यांचे साहित्य अभ्यासाला घेतले आहे तसेच त्यांच्या फकीरा कादंबरीस महारष्ट्र शासनाने सर्वोच्च कादंबरीचा पुरस्कार देखील दिला आहे.
म्हणून २०२० हे साहित्यसम्राट लोकशीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोपरांत "भारतरत्न" या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी आपल्या स्तरावर ठराव घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अश्या आशयाचे निवेदन जनहित युवा मोर्चाचे महासचिन अ‍ॅड.सचिन मेकाले यांच्या नेतृत्वात जिवती तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याना देण्यात आले.
निवेदन सादर करताना जनहित युवा मोर्चा चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, सय्यद शब्बीर जागीरदार, डॉ. अंकुश गोतावळे,विजय गोतावळे, शाहीर संभाजी ढगे,दत्ता गायकवाड, बंटी ब्राम्हचे यांची विशेष उपस्थिति होती.