गैरसमजातून अफवा पसरविण्यात आली, त्या माझ्या मुलीप्रमाणे-दुकानदाराचे म्हणणे !



गैरसमजातून अफवा पसरविण्यात आली, त्या माझ्या मुलीप्रमाणे-दुकानदाराचे म्हणणे !
सदर प्रकरणाविषयी संबंधित प्रतिष्ठित व्यक्तीला विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देतांना स्पष्ट मत व्यक्त केलं की या मुली आपल्या दुकानात काही दिवसांपासून काम करत होत्या परंतु ज्या पद्धतीने सांगण्यात येत आहे, तसे काहीही घडले नाही. मुलींचा गैरसमज झाला व त्यांनी प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. आरोप करणाऱ्या मुली या नवीन असल्यामुळे त्यांना दुकानातील कामकाज समजून देण्याचा आपण प्रयत्न करीत होतो. त्यात हा गैरसमज घडला, आपल्या मुली एवढेच त्यांचे वय असून त्या माझ्या मुली सारख्याच आहे असे असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच संबंधित व्यक्तीने या प्रकरणात मुलींच्या कुटुंबियांना बोलवून त्यांना काय घडले हे सांगण्यात आले व झालेला गैरसमज दूर करण्यात आला असे मत व्यक्त करीत यापूर्वी आपल्या दुकानात कधीही मुली कार्यरत नव्हत्या. त्यांना कामाची गरज होती व त्या मुली काम मागण्यास आल्यामुळे त्यांना काम देण्यात आले. ही घटना आपल्या आयुष्यातील दुर्भाग्यकारक घटना असल्याची कबुलीही संबंधितांनी यावेळी दिली.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर मध्ये आज एका दुकानात काम करणाऱ्या मुलींशी छेडखानी करण्यात आल्याच्या चर्चेला ऊत आला होता. आत्ता गडचांदूरात ही "me too" या चर्चेची परिसरात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीला मिळालेल्या माहितीनुसार प्रकरण पुढीलप्रमाणे असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचांदूर येथील व्यापारी असोसिएशनचे माजी पदाधिकारी असलेले एक प्रतिष्ठित व्यक्ती यांचा गडचांदूर मध्ये भर बाजारपेठेत दुकान आहे. त्यांच्या दुकानात मागील चार दिवसांपासून ग्रामीण भागातील दोन मुली कार्यरत होत्या. या मुली नवीन असल्यामुळे त्यांना दुकानातील कामाचा अनुभव नव्हता. आज गुरुवार दिनांक 20 रोजी या मुलींनी आमचे दुकानाचे मालक आमची छेडखानी करून राहिले, असा आरडाओरड केला आणि परिसरात हडकम्प मचला. प्रकरण इभ्रत काढणारे आहे असं लक्षात येताच दुकान मालकांनी मुलींच्या नातेवाइईकांना बोलवून त्याच वेळी प्रकरण निस्तारले, यावरूणचं गडचांदूर मध्ये ही "me too" ची चर्चा रंगली, यासंदर्भात गडचांदूर च्या काही प्रतिष्ठित चर्चा केल्यानंतर अशी घटना घडली आहे यावर अनेकांनी दुजोरा दिला तर काहींनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगून तोंडावर बोटे ठेवली.