▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

दूधाचा दर कमी झाल्याने दूध दरवाढ करण्याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !



चंद्रपूर : कोरोनाच्या उद्भवलेल्या भयावह समस्येनंतर राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विदर्भ सचिव संजय कन्नावार यांनी आज चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना निवेदन देण्यात आले. 

यापूर्वी दुध उत्पादक शेतक-यांना प्रतीलिटर ३४ रुपये दर होता. मात्र आता २० रु. इतका झाला आहे. त्यामूळे दुध उत्पादक शेतकरी हा आर्थीक संकटात सापडला आहे. दुधाचा दर कमी झाल्याने शेतकन्यांना मोठया प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने दुध दरवाढ तात्काळ करावी. तसचे प्रतीलीटर १० रुपये प्रमाणे अनुदान शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
तसेच दुध दरवाढ करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात न आल्यास चंद्रपूर जिल्हयातील शेतकन्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेवराव जानकर यांच्या आदेशानुसार संजय कन्नावार  यांनी दिला आहे.