प्रभागात प्रतिबंधात्मक उपाय करून आरोग्य विभागाची तपासणी!अफवांना बळी पडू नयेप्रशासनाचे आवाहन!

प्रभागात प्रतिबंधात्मक उपाय करून आरोग्य विभागाची तपासणी!अफवांना बळी पडू नये प्रशासनाचे आवाहन!                
चंद्रपुर प्रतिनिधी:- देशभरात कोरोनाचे सावट पसरल्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्तं रुग्ण असल्याचे नमुद केल्या गेले आहे.मुबंई,पुणे, नागपुर हि शहरे रेड झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात एकही रूग्ण आढळून न आल्याने ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्हा हा कोरोनामुक्त रहावे यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील आहे.बाहेर येणाऱ्या नागरीकांची कसून तपासणी करण्यात येत आहे.आज दि.२५एप्रील रोजी प्रत्येक प्रभागात कोरोना रूग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीची खोकला सर्दी ताप व श्वसनाचे त्रास होतो का अशी विचारपूस करून तसा अहवाल तयार केला जाणार आहे.आणि तो अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.आज रोजी भिवापूर वार्ड, महाकाली वार्ड,तुकूम हनुमान नगर, महाकाली काॅलरीअश्या भागात पोलीसांनी मॅकड्रीलच्या माध्यमातून ही क्षेत्रे प्रतीबंधीत केलेल्या गेले आहे.पोलीसांचा माॅकड्रिल हा प्रकार असून घाबरण्याचे कारण नाही.हा आरोग्य तपासणीसाठी चा भाग असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्र्वास न ठेवता सहकार्य करावे,हा एक महत्त्वाचा विषय आहे.नागरीकांनी घरी येणार्या प्रगणकांना योग्य ते सहकार्य करावे,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.मात्र नागरीकांमध्ये कोरोना रुण मिळाल्याच्या अफवेला ऊत आलेला आहे.नागरीकांनी अश्या अफवांवर विश्र्वास ठेऊ नये,असे आवाहन ही प्रशासन करीत आहे.उद्या दि.२६रोजी एकोरी वार्ड,रहेमतनगर या परीसरात ही तपासणी केली जाणार आहे अशी माहिती संबंधित प्रशासनाने दिली आहे.