जनतेनी घेतलेले कर्ज आणि वसुल करण्यात येणारे हप्ते शासनाने आखलेल्या अधिनियमानुसार घेण्यात यावे:-भरत गुप्ता.

जनतेनी घेतलेले कर्ज आणि वसुल करण्यात येणारे हप्ते शासनाने आखलेल्या अधिनियमानुसार घेण्यात यावे:-भरत गुप्ता.            
जगभरात नोवेल कोरोना या विषाणुने हाहाकार माजवला आहे. यामुळेच गेल्या २१ दिवसांपासुन देशात लॉकडाऊन सुरू आहे. नूकताच मा. पंतप्रधानांनी हा लॉकडाऊन कालावधी ३ मे पर्यंत वाढवला आहे. या कालावधीत कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी सर्वांना सक्तीने घरी थांबण्याचे शासकीय आदेश आहेत.कर्ज वसुली करण्यासाठी कर्ज दिलेल्या कंपण्यांना ३ महिने पुढे ढकलण्या बाबतचे अधिनियम महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनेही काढलेले आहेत. 
मात्र काही फायनान्स कंपन्या शासनाचे नियम धाब्यावर बसवून कर्ज वसुली वर अतिरिक्त व्याज किंवा दंडाची रक्कम वाढवत आहेत आणि वसुली साठी त्रास देत आहेत, तो त्रास या कालावधीत न देता त्यांना व्याजाची रक्कम अव्वाची सव्वा न करता त्यांना वेळ देण्यात यावा, लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत कृपया कोणत्याही व्यक्तीचे लोन चे ई एम आय बाऊन्स करून अधिरिक्त दंडाची आणि व्याजाची रक्कम न वाढवता, त्यांना वसुली साठी त्रास न देता सहकार्य करावे. या सर्वांनी गेली अनेक वर्षे आपणांस साथ दिलेली आहे, आता निदान काही महिने त्यांना त्रास न देता साथ द्यावी. मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा अवमान करू नये, अन्यथा आम्हाला मनसे पध्दतीने आंदोलन करण्याची वेळ आणू नये असे आवाहन ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.