विदर्भात दुसऱ्यांदा राष्ट्रीय समाज पक्षाचे २० वे वर्धापन दिन




लोकसभा निवडणूकीनंतर राज्यात विधानसभा निवडणूकिचे बिगूल वाजले . विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षाचे २० वे वर्धापन दिन अकोला येथे होत आहे.या अधिवेशनात राष्ट्रीय समाज पक्षात अनेक मातब्बर नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.त्यामुळे विदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाला बळकटी मिळणार आहे.विदर्भात बाळापूर,तिवसा, राजुरा, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, यवतमाळ , नागपूर, रामटेक अश्या अनेक ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार आहे.



राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे करण्यात आली.राष्ट्रीय समाज पक्षाचे देशभरात अनेक ठिकाणी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अकोला येथे दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी दुसऱ्यांदा २० वे वर्धापन दिन विदर्भात साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.



राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री मा.आमदार राष्ट्रनायक मा.महादेवराव जानकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विवीध नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन साजरी होत आहे.यासाठी मा.काशिनाथ( नाना) शेवते -प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मा.ज्ञानेश्वर (माऊली) सलगर- मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य मा .एस एल अक्कीसागर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज एम्प्लाइज फेडरेशन, राष्ट्रीय महासचिव सुशिलकुमार पाल,लेंगे मामा ,गोवींदराम सुरनर संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली


राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ तौसीफ शेख, विदर्भ महासचिव संजय कन्नावार,राजु गोरुडे, अनुप यादव, प्रदेश कार्यकारणी सदस्य नाना भाऊ देशमुख ,ॲड संतोष कोल्हे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव,गणेश मानकर, अकोला जिल्हाध्यक्ष दादाराव ढगे, प्रदीप गाव़डे, चंद्रपूर जिल्हाध्यक्षा वंदना गेडाम, अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुरज ठाकूर ,वर्धा जिल्हाध्यक्ष संजय मेघे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर डोईफोडे,सुनील शेन्डे, शिवदास अक्कलवार प्रा.विठ्ठल गिरवलकर आदी परीश्रम घेत आहेत.



शनिवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
राष्ट्रीय समाज पक्षाचे २० वै वर्धापन दिन अकोला येथे साजरी होत आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्धापन दिन दुसऱ्यांदा विदर्भात होत असल्याने नियोजन व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तातडीची बैठक नागपूर येथील आमदार निवास मध्ये दि.२०/७/२०२४ रोजी दुपारी २ वाजता घेण्यात येत आहे.या बैठकिला विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार यांनी केले आहे.