लोकसभेत जानकरांची वाट पाहतो,त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी परभणी करांची.. पंतप्रधान मोदींचा संदेश



परभणी लोकसभा निवडणूकीसाठी उभे असलेले महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला.आयोजीत जाहीर सभेत भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेला उशीर झाल्यामागचे कारण सांगीतले.


जेव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विमानतळावर निरोप देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी निवडणुकीचा प्रचार कसा सुरू आहे असं विचारलं, आम्ही त्यांना चांगलं चाललंय सांगितलं, आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललोय. महादेव जानकर यांचा अर्ज भरायला चाललोय. तेव्हा मोदी म्हणाले, जानकर यांना सांगा, १८ व्या लोकसभेत मी त्यांची वाट पाहत आहे. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परभणीवासियांनाही माझा मेसेज द्या, जानकर यांना निवडून देण्याची तुमची जबाबदारी आहे. जानकर यांना दिल्लीत खासदार म्हणून पाठवा असा निरोप फडणवीसांनी भाषणातून दिला. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी लोकसभा निवडणूक ही भाऊकीची आणि गावकिची नाही, महायुतीचे वरीष्टांनी घेतलेला निर्णय सिरसांध मानुन कार्यकर्ते पदाधिकारी यांनी कामा लागून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना निवडून आणायचे आहे. समाजातील सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहचणारे महादेव जानकर  आहेत.सामाजीक न्याय आणि व्हीजन असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे.उच्च शिक्षीत आहेत.त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा फायदा लोकसभेच्या सभागृहात करता येईल.विरोधकाकडून ४०० खासदार निवडून आले तर संविधान बदलवून टाकतील असा अपप्रचार केला जात आहे.मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान कोणी मायका लाल बदलवू शकणार नाही.असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जाहीर सभेत केले.

 

तसेच महादेव जानकर हे मूर्ती लहान किर्ती महान आहे. ५ वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळात काम केले. कुणकुण नाही, कुरबूर नाही. ५ वर्ष खात्यातून सर्वसामान्यांसाठी काम केले. ५ वर्षात एक रुपयाचा डागही महादेव जानकरांवर कुणी लावू शकले नाही. मंत्रिमंडळ गेल्यानंतर हा मंत्री फाटकाच राहिला, आजही फाटकेच राहिलेत म्हणून लोकांच्या मनात त्यांचे घर आहे. महादेव जानकरांची श्रीमंती ही सर्वसामान्य जनता आहे. वंचित, शोषित जनता ही महादेव जानकरांची कमाई आहे असं फडणवीसांनी सांगितले. 


दरम्यान, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. तेव्हा महादेव जानकरांना उमेदवारी मिळावी असं मी अजितदादांना सांगितले. त्यावेळी तात्काळ दादांनी विटेकरांना बोलावून ही जागा जानकरांना दिली पाहिजे असं सांगितले. त्यावर राजेश विटेकर यांनीही ती मान्य केले. महायुतीची ताकद आम्ही तयार केलीय. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्राने ४१ खासदार मोदींच्या झोळीत टाकले. तो रेकॉर्ड आम्ही मोडणार असून त्यापेक्षा जास्त खासदार आम्ही पाठवणार आहोत. या खासदारांमध्ये पंकजा मुंडेंसोबत महादेव जानकर हेदेखील असणार आहेत असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.