जानकर सोबत असल्याचे भासवित वरिष्ठ राजकीय पक्षांचे नेते जनतेची करीत आहे दिशाभुल!

 
(वि.प्रति.)

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचा महायुतीच्या बैनरवर फोटो आहे, म्हणजे ते सोबत आहेत आपला राजकीय फायदा होऊ शकतो, त्यांच्या नावावर मते येऊ शकतात, असे वाटणाऱ्या संधीसाधू महायुतीच्या राजकीय नेत्यांनी रासप किंवा महादेव जानकर यांना न्याय न देता कोणत्याही परवानगी दिली नाही.


पूर्वसुचनेविना बारामती येथील खडकवासला मतदार संघात रा.काॅ.चे अजित पवार, भाजपचे चंद्रकांत पाटील, राकाॅ च्या रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा सध्या व्हायरल होत असलेले छायाचित्र आदर्श आचारसंहिता चे उल्लंघन करणारे आहे, त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार करण्यात येणार आहे. स्त:ला मोठे म्हणविणाऱ्या राजकीय पक्षांची व त्यांची ही कृती अत्यंत निंदनीय असून त्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.लोकसभा सन २०२४ ची १७ वी सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. नामनर्देशित अर्ज भरणे सुरू आहे.मात्र अजूनही राजकीय पक्षाचे उमेदवार घोषित न झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्यात आले नाही.


....तर मुनगंटीवार ही ,"डेंजर झोन" मध्येमहायुतीतील भाजपाने आपले उमेदवार घोषित करून बासींग बांधून उभे ठेवले आहे. इंडीया आघाडीचा उमेदवारीचा तिढा अजून न सुटल्याने  उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. सन २०१४ आणि २०१९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला व इतर घटक पक्षांना सोबत घेतल्याने महायुतीचा विजय झाला. तेच गणीत लावून महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर यांचा युतीमधील बॅनरवर फोटो लावून प्रचार सुरू केला आहे.जानकर महायुती सोबत असल्याचा दावा करीत आहे. मात्र जानकरांना महायुतीच्या बैठकीला किंवा एक उमेदवार सुध्दा न दिल्याने ते नाराज आहेत. महायुतीने लहान लहान घटक पक्षांना संपवीण्यासाठी मोठ मोठे पक्ष फोडण्याचे काम सुरू केले आहे.या लहान लहान घटक पक्षामधील नेत्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे.


राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी देशभरात पक्षाचे जाळे पसरविले आहे.जानकरांना मानणारा मराठा,ओबीसी , एस सी एसटी व्हिजेएनटी समाज आणि धनगर समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.महायुतीला त्याची जाण असल्याने जानकरांच्या फोटोचा वापर करून मतदारांना जानकर महायुती सोबत असल्याचे दाखवीत आहे.


२०१४ आणि २०१९ मध्ये हा राष्ट्रीय समाज एकवटला आणि महायुतीची सत्ता आली. त्यात राष्ट्रीय समाज पक्षाची महादेवराव जानकर यांची महत्त्वाची भूमिका ठरली मात्र यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीत समाविष्ट न केल्याने समाजात नाराजी पसरली आहे आणि त्याचा फटका या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसणार आहे.