मुल तालुक्यातील नांदगाव येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असते त्या बाजारात आसपासच्या जवळील गावातील गावकरी या आठवडी बाजारात येत असतात.या बाजारात मटन कोंबडी मच्छी विक्रेते आपली दुकाने लावून बसतात.मात्र मच्छी मटनेचे फेकण्यात येणारे मटेरीयल त्याच ठिकाणी ठेवून चालले जातात.त्यामुळे दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने बाजाराजवळील आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा प्रचंड नाहक त्रास होत असते.
याबाबत अनेकदा ग्रामपंचायतचे सरपंच सचिव यांना लेखी व तोंडी तक्रार करण्यात आली आहे.याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने या परीसरात रोग पसरत आहे.त्यामुळे वेळीच या मटन मच्छी विक्रेत्यांची दुकाने दुसरी कडे हलविण्यात यावे.अन्यथा परीसरातील नागरीकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.