धनगर आरक्षणात बोगस झाडे कुणबी ची घुसखोरी Kunbi encroachment of bogus trees in Dhangar reservation



गडचिरोली - पोलीस शिपाई पद भरती मधील भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडे उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी व इतर मागणिकरिता पोलीस अधीक्षक,जात पडताळणी समिती, राज्य राखीव पोलीस बल विभागातील विषयावर धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात पोलीस भरतीतील अन्यायग्रस्त उमेदवार 10 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 


गडचिरोली जिल्ह्यात झाडें कुणबी या जातीतील कुणबी हा शब्द वगळून धनगर व तत्सम जातीतील अनुक्रमांक 15 वरील झाडें या पोटजातीचा आधार घेऊन नामसदृश्यतेचा गैरफायदा घेत भटक्या जमाती (क) प्रवर्गातील असल्याचे दाखवून खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीमध्ये नियुक्त झालेले आहेत. 


गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरती 2021 व सन 2022 मध्ये 13 बोगस झाडे उमेदवारांची निवड झाली तर राज्य राखीव पोलीस भरती 2022 मध्ये 5 बोगस उमेदवारांची निवड झाली त्यामुळे खऱ्या भटक्या जमाती क प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झालेला आहे.गडचिरोली पोलीस भरती 2021मध्ये  नियुक्त झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडें उमेदवारांनी सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना बडतर्फ करण्यात यावे, गडचिरोली पोलीस भरती 2022 मध्ये निवड झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील उमेदवार ज्यांची जात वैधता रद्द झालेली आहे त्यांचेवर गुन्हे दाखल करून निवड रद्द करण्यात यावी.


 भटक्या जमाती (क) मधील बोगस झाडें उमेदवारांचे जात पडताळणी समिती गडचिरोली यांनी तात्काळ जात वैद्य/अवैद्य ठरवावे, गडचिरोली पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील खऱ्या भटक्या जमाती (क) उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, राज्य राखीव पोलीस भरती काटोल येथील बोगस झाडें उमेदवारांना बडतर्फ करण्यात यावे.
या मागण्या घेऊन धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त पोलीस भरती उमेदवार,प्रविण लंबूवार,गणेश देवावार,मोरेश्वर पाटेवार,भारत सिर्गावार, खुशाल मल्लेलवार,भोजराज लांबेवार,जितेंद्र काडीवार,अमोल सिदधमवार,मल्लेश येग्गावार,निखिल उमलवार,अक्षय मिडपलवार,भोलेश्वर फेबुलवार,राहूल अन्नावार,शुभम सिर्गावार,प्राची मेडेवार आदी उमेदवार बेमुदत उपोषणाला बसले आहेत.


या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी डॉ.तुषार मर्लावार नागपूर विभाग अध्यक्ष,श्री.विजय कोरेवार,माजी सभापती पं.स.सावली श्री.लचसा शिर्गावार जिल्हाध्यक्ष गडचिरोली,श्री. संजय कन्नावार,अध्यक्ष अखील भारतीय मौर्य क्रांती सेना, श्री.मुखरूजी ओगेवार,श्री.राजाराम उईनवार.श्री,क्रिष्णा गंजेवार,श्री.राजू कंचावार,युवा कार्यकर्ता,राहुल डंकरवार,युवा कार्यकर्ता,सुरेश कन्नमवार,श्री,बिराजी शिर्गावार,श्री.दिलीप कोरेवार,श्री.बिराजी मल्लेलवार,श्री.शंकर कन्नमवार,श्री.प्रभाकर येगडेवार इत्यादी जास्त संख्येने समाज बांधव उपस्थित होते.