ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन तिकीट बुकिंग घोटाळा Online ticket booking scam in Tadoba Tiger Reserve
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पOnline ticket booking scam in Tadoba Tiger Reserve  Tadoba-Andhari Tiger Reserve in Chandrapur Districtचा ऑनलाइन तिकीट बुकिंग घोटाळा नुकताच सामोरं आला असून यातील अभिषेक ठाकूर व रोहित ठाकूर यांच्या बुकिंग एजन्सी विरोधात रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे, चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन Chandrapur Wild Connectivity Solutionsअसे बुकिंग एजन्सी चे नाव असून या बुकिंग एजन्सी ने ताडोबात सुमारे 12 कोटी 15 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार ताडोबातील विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे Divisional Forest Officer Sachin Shindeयांनी रामनगर पोलिसांत दिली होती

ताडोबातील विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांना या एजन्सीची पोलिसांत का तक्रार केली ? आतापर्यंत या एजन्सी ला कोणपाठीशी घालत होते ? या एजन्सीसोबत साठगांठ करणारे ते वन अधिकारी कोण आहेत? एका वन अधिकाऱ्याला सेवानिवृत्ती नंतर सुद्धा या तिकीट बुकिंग च्या देखरेखीत कां ठेवण्यात आले होते ? ठाकूर यांची अधिकृत वेबसाईट अजूनही बुकिंग कशी घेत आहे ? या व अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत आणि जर उत्तर मिळले तर आता तक्रारीत नमूद घोटाळ्याप्रकरणी काही वनाधिकारी सुद्धा अडकू शकतात एवढा मोठा घोटाळा झाला आहे.वनाधिकारी यांच्या संगनमताने व मर्जीने ताडोबा ऑनलाईन तिकीट बुकिंग एजन्सी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनने गेल्या 3 वर्षात (10/12/21 ते 17/08/23 ) एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रक्कमे पैकी केवळ 10 कोटी 65 लाखांचा भरणा केला असल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे मात्र याही पेक्षा हा मोठा घोटाळा असून जर व्हीआयपी बुकिंग घोटाळा बाहेर आला तर पुन्हा खळबळ उडेल एवढा हा घोटाळा शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे वन विभागाची एवढी मोठी यंत्रणा असतांना एका खाजगी एजन्सीने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करावा यावर कोन विश्वास ठेवेल ? दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान आणि एजन्सी यांच्यात झालेल्या कराराच्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिषेक विनोदकुमार ठाकुर व रोहीत विनोदकुमार ठाकुर रा. प्लॉट क्र. 64 गुरुद्वारा रोड, चंद्रपूर यांच्याविरुद्ध कलम 420, 406 अन्वये फसवणुक व पैशाची अफरातफर करणारे गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा योग्य तपास केला तर यात मोठे मासे गळाला लागतील असे चित्र असून या संदर्भात एक एक पुरावे सामोरं येत आहे.