सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे.आ.जानकर OBC should be in power for social and economic transformation. A. Jankarओबीसीच्या बहुजनाच्या सर्वांगीण विकासाकरता आमच्या चळवळीची भूमिका आणि मराठ्यांचे ओबीसीकरण शासनाचा डाव, ओबीसी समोरील आव्हान या विषयावर महादेवजी जानकर यांनी विस्तृतपणे आपली भूमिका व्यक्त केली. ओबीसी नी आता सत्तेचे स्वप्न पाहिले पाहिजे, आणि सत्तेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले पाहिजे तोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळणार नाही, त्याकरता मी जिवाच रान करत आहे .तुम्ही सुद्धा जीवाचं रान करण्याकरता या सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. असे आवाहन माजी मंत्री आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.सत्यशोधक समाज स्थापनेच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्ण वर्ष महोत्सवी वर्षानिमित्त, तथा आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, व मंडल मसीहा विश्वनाथ प्रताप सिंग, यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने एक दिवशीय संवाद परिषदेचे आयोजन सेवादल महिला महाविद्यालय. सकरदरा चौक नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाजी बेले ज्येष्ठ नेते तथा राज्य संघटक विदर्भ तेली समाज महासंघ स्वागत अध्यक्ष संजय शेंडे अध्यक्ष सेवा दल महिला विद्यालय नागपूर, उद्घाटक एस एल अक्रीसागर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज एम्प्लॉज फेडरेशन यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली ,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माननीय अरविंद माळी सत्यशोधक प्रबोधनकार नागपूर महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ यांनी सामाजिक क्रांती शिवाय राजकीय परिवर्तन अशक्य आहे ,याकरता आपल्या स्वतःमध्ये अमुलाग्र परिवर्तन कशा पद्धतीने आपल्याला घडवून आणावा लागेल ,आणि फुले, शाहू आंबेडकरांची विचारधारा जन माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल, ही भूमिका त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.


माननीय गोपाल भारती अध्यक्ष राष्ट्रीय संयुक्त मोर्चा यांनी संपूर्ण भारतातील वेगवेगळे विचार प्रवाह एकत्रित आणून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला पण हरवू शकतो या पद्धतीची भूमिका व्यक्त केली. राष्ट्रीय सामाजिक संघटिका प्राध्यापक सुशीलाताई मोराळे बीड यांनी या देशांमध्ये सामाजिक परिवर्तन व आर्थिक मुक्ती करता लढा देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या संघर्षाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आता काम केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट रमेश पिसे, भूमिका विलास काळे यांनी मांडली ,आभार सुधीर सुर्वे यांनी मांडले कार्यक्रमाच्या आयोजना करता उमेश कोराम,अनिल कुमार, इंजिनियर हमीद, शुभांगी घाटोळे , मिस्टर अफजल,हरीकिशनदादा हटवार ,प्राध्यापक राहुल मून ,अरुण गाडे संजय रामटेके यांनी मेहनत घेतली तर मुख्य आयोजन राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत ,भारतीय पिछडा (ओबीसी) संघटक ओबीसी जन मोर्चा ,संविधान परिवार ,विदर्भ तेली समाज महासंघ, समाज क्रांतीपरिवार ,महाराष्ट्र कास्टट्राईब संघटना यांनी आयोजन केले. सर्वांचे स्वागत स्वागताध्यक्ष संजय शेंडे अध्यक्ष सेवा दल महिला विद्यालय नागपूर यांनी केले,