जगन्नाथाच्या रथाचे चाक ओढण्याचे भाग्य ज्याला लाभले तो व्यक्ती स्वतः ला पुण्यवान समजतो असाच एक जगन्नाथ नावाचा धनगर माणदेशात बिरुबाच्या नावाने चांगभलं म्हणून गुणाईच्या मदतीने आपल्या मेंढराचा वाडा रानावनात चारत असतांना त्यांच्या वेलीवर एक रानफुल फुलले आणि या रानफुलाच्या सुगंधाचा दरवळ यशवंत सेनेच्या माध्यमातून देशभर पसरला.
या जगन्नाथाच्या महादेवाचा आम्ही रथ ओढला आणि पावन झालो. काळाने ज्याला त्याला रस्ता दाखवला त्या रस्त्यावर रस्त्यावर महादेवाचे चांगभले म्हणणारे भगत भेटत गेले.धनगर जमातीच्या तरुणांना स्वाभिमानाची आणि निर्भिडतेचे बाळकडू पाजणा-या स्व.बापुसाहेब कोकरे यांच्या स्वप्नाला साकार करणाऱ्या रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जगन्नाथ जानकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भगीरथाने महादेवाला प्रसंन्न करुन गंगेला जटेत धारण केले होते कलयुगात गंगेचे पाणी मस्तकाच्या कावडीत भरुन दुष्काळी मनाला पाजण्याचे काम महादेवाने केले धनगरांना महादेवापासून विठोबा, बिरोबा, खंडोबा,धुळोबा, मायाक्काची मोठी परंपरा आहे.
थोरले सुभेदार मल्हारराव होळकर,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुण्याईचा आणि पराक्रमाचा वारसा लाभलेल्या धनगर लोकात नेहमीच जगापेक्षा काहीतरी वेगळे करुन दाखवण्याची जिद्द धमक असते असाच एक प्रयत्न महादेव जानकर यांनी महाराष्ट्रात केला वीस वर्षापूर्वी त्यांच्या सोबत आम्ही चालत असतांना लोक हसत होती मात्र महादेव जानकरांचे त्याकडे लक्ष नव्हते आज काळ बदलला महादेव जानकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील परंपरा बदलून टाकली
धनगरासह प्रस्तापित आणि विस्थापितांना राजकारणातले "राजपाटाचे "कारण समजावून सांगितले महाराष्ट्राच्या राजकारणात रडण्यापेक्षा लढण्यात पुढाकार घ्या, एका मुलाला उच्च दर्जाची नोकरी मिळवून द्या आणि दुसऱ्याला राजकारणात पाठवा असा मुलमंत्र समजावून सांगून नवी उमेद निर्माण केली.
बदल आम्ही घडवणार असे सांगुन पारंपरिक सत्ताकारणातल्या म्होरक्यांना ओपन चँलेज देवून नवतरुणांना मैदान खुले करुन दिले. लढणारे आम्ही लोक थांबणार नाहीत जिथे आहोत तिथून का होईना महादेवाच्या नावाने चांगभले करणार आहोत आणि काळाच्या उदरात लपलेला उजेड धनगरांच्या झोपडीत नेणार आहोत.
दि.19 एप्रिल 2023
*साहेब आपणास जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!*
#mahadevjankar
#म्हाळसाकांत_बळ_देईल
-रामभाऊ लांडे,अंबड