नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये लागली आग Fire broke out in Nagpur Medical Collegeनागपूर येथील मेडीकल कॉलेज मधील नवीन ट्रामा सेंटर मधील आयसीयू ३ मध्ये अचानक शाॅट सर्कीट झाल्याने एसी मध्ये आग लागली.या युनिट मध्ये १५ ते २० रुग्ण उपचार घेत होते.रुग्णांची चिंताजनक असतांना आग लागल्याने कर्मचाऱ्यांची व नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली. आग लागल्यानंतर रुग्णांना जवळील वार्ड मध्ये हलविण्यात आले.त्या युनीट मधील सर्व उपकरणे बंद करण्यात आली.कोणताही अनुचित प्रकार घडला नसून सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.