रासपच्या अमरावती विभागाचे प्रभारी म्हणून डॉ.मोहमद तोशिफ मोहमद युनिस Dr. Mohammad Tosheef Mohammad Younis as in-charge of RASAP Amravati Divisionराष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत अमरावती विभागातील अकोला, यवतमाळ, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांची राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक शासकीय विश्राम गृह अमरावती येथे नुकतीच पार पडली.            

       या बैठकीत अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांत पक्ष बांधणी मजबूत करून आगामी निवणुकीला सामोरे जाण्याची तयारी करण्याचा निर्णय सर्वानुमते  घेण्यात आला. या बैठकीत  राष्ट्रीय समाज पक्षाच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष व अमरावती विभागाचे  प्रभारी  म्हणून डॉ. मोहमद तोशिफ मोहमद युसूफ यांची नियुक्ती करण्यात आली.या बैठकीला विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे, यांचेसह कृषी सम्राट राजेंद्र पाटील संपर्क प्रमुख विदर्भ प्रदेश, पुरुषोत्तम कामडी,कोषाध्यक्ष विदर्भ प्रदेश, अमरावती  पशु संवर्धन विभागाचे निवृत्त सहायक आयुक्त डॉ. मोहन गोहत्रे,साहेब, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मेश्राम, वाशीम जिल्हा अध्यक्ष दिपक तिरके, अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे,जिल्हा महासचिव   आशिष कोल्हे, अमरावतीचे प्रदीप पाथुर्डे, विलास उमाळे, संदीप शिरसाठ, नबाब साहब आदी मान्यवर उपस्थित होते.