▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

When the fence eats the field...कुंपणच शेत खाते तेव्हा......
चंद्रपुर :- जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या अवैध रेतीच्या पकडण्यात आलेल्या गाड्यांचे डिझेल, बॅटरी व इतर साहीत्य चोरी करुन ते विकण्याचा गोरखधंदा करीत असतांना तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना गाडीतून डिझेल काढतांना शिवसेना shivsena (उद्धव ठाकरे) युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांनी रंगेहाथ पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.  अवैधरित्या रेती व इतर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नायब तहसीलदार tahsildar यांनी रामनगर परीसरातून कारवाई केली.ती वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते.त्या वाहनातून डिझेल,बॅटरी व इतर साहीत्य चोरी करतांना दोन जणांना शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी रंगेहाथ पकडले, या परीसरातून अश्या प्रकारे अनेक वेळा चोरी झाली असून अनेक वाहनांचे साहीत्य चोरीला गेले असल्याची माहिती आहे. डिझेल व बॅटरी चोरी प्रकरणात तहसील कार्यालयाचे कर्मचारी अश्या प्रकारचे चोरी करीत असून "कुंपणच शेत खात" असल्याने  दाद कुणाकडे मागायचे हा मोठा प्रश्न आहे.वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आले नाही.