चंद्रपुरला भुकंपाचे हादरे



चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरामध्ये रात्रीच्या नऊ वाजून ती मिनिटांनी भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याने परिसरातील नागरिकात दहशत पसरली आहे. हा धक्का wcl च्या ब्लास्टिंग मध्ये झाला की भूकंपाचा आहे याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. नऊ वाजून 30 मिनिटांनी हा धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत सर्व नागरिक घाबरले आहेत.

'वोल्कॅनो डिस्कवरी डॉट कॉम'VolcanoDiscovery.com' या संस्थेच्या संकेतस्थळावर भूकंपाची तिव्रता एक मॅग्नेट्यूडपेक्षा अधिक दर्शवण्यात आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटरच्या खोलीत भूकंप घडून आल्याची नोंद आहे. परंतु, 'नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी'National Center for Seismology' या भारतातील अधिकृत संकेतस्थळावर याबाबत कोणतीही माहिती वृत्तलिहिस्तोवर देण्यात आलेली नव्हती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शहरातील खदानीजवळील भागांसह इतरही अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या लोकांनी आपली भीती व्यक्त केली. दरम्यान, लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.