▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

राष्ट्रीय समाज पक्षाची नागपूरात 18 डिसेंबर ला तातडीची महत्वपूर्ण विदर्भस्तरीय पदाधिकारी बैठकराष्ट्रीय समाज पक्षचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राष्ट्रनायक आ. महादेवजी जानकर साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शनात नागपूरात हिवाळी अधिवेशन दरम्यान बुधवार दिनांक 21डिसेंबर 2022रोजी "जवाहर विद्यार्थी वसतिगृह, सिव्हिल लाईन्स नागपूर "येथे "विदर्भ स्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर " आयोजित करण्यात आले आहे. 
    हे कार्यकर्ता शिबीर यशस्वी करण्याकरिता पूर्व नियोजीत  तयारी  करण्याकरीता  विदर्भ कार्यकारणी पदाधिकारी,  सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व  शहर  कार्यकारणी पदधिकारी यांची रविवार दिनांक 18डिसेंबर 2022रोजी दुपारी 1::00 वा. 'रासपचे विदर्भ जनसंपर्क कार्यालय, आशीर्वाद नगर, म्हाळगीं  नगर चौक, रिंगरोड H.P. पेट्रोल पंपसमोर नागपूर येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला रासप पदाधिकाऱ्यांनी न चुकता हजर राहावे आणि कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहयोग राशी विदर्भ कोषाध्यक्ष मा. पुरुषोत्तम कामडी साहेब यांचे कडे" विदर्भ जनसंपर्क कार्यालय नागपूर येथे त्यावेळी रोखीने  /धनादेशाद्वारे  (2000 /- रुपयेअथवा  स्वेच्छेने ) जमा करावे असे जाहीर आवाहन रासपचे विदर्भ अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे यांनी केले आहे.  अशी माहिती विदर्भ सचिव रामदास माहुरे यांनी दिली.