मुख्य अभियंता पंकज सपाटे यांची कार्यकारी संचालक पदावर बढती



चंद्रपूर महाजेनकोच्या अखत्यारीत असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता (सीई) पंकज सपाटे आणि पारस औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांना कार्यकारी संचालक (इडी) म्हणून बढती देण्यात आली आहे. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बढतीचे आदेश सोमवारी निघाले असून, सध्या नियुक्ती असलेल्या ठिकाणावरूनच ते नवीन कार्यभार सांभाळणार आहेत. पंकज सपाटे यांच्याकडे संचालन व सुव्यवस्था- २ चे कार्यकारी संचालकपद देण्यात आले आहे. तर विठ्ठल खटारे हे सौर, नउप्र, सानिवसू आणि स्थापत्य विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून काम सांभाळणार आहेत. दरम्यान, पदोन्नती देण्यात आलेल्या मुख्य अभियंत्यांनी पदोन्नती स्वीकारण्याबाबत त्यांचा होकार अथवा नकार, पदोन्नती आदेश मिळाल्याच्या सात दिवसांच्या आत कळवावा. संबंधित अधिकाऱ्याने पदोन्नती नाकारल्यास त्यांनी पदोन्नती नाकारली या आधारावर यापुढे सतत त्याच ठिकाणी ठेवण्याचा दावा करता येणार नाही, असे या पदोन्नती आदेशात म्हटले आहे. 


पंकज सपाटे यांनी चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सरकारने कोरोनाकाळात खर्चात प्रचंड कपात केली होती. अशाही परिस्थिती त्यांनी वीज केंद्राला पुढे नेले. मधल्या काळात कोळशाची टंचाई असतानाही वीज उत्पादनावर कोणताही फरक पडू दिला नाही, तसेच वीज केंद्रातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठीसुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली. या कामांची दखल घेत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने पंकज सपाटे यांना बढती दिली आहे. संचालन व सुव्यवस्था २ चे कार्यकारी संचालक म्हणून त्यांच्याकडे आणखी काही महाऔष्णिक वीज केंद्राची जबाबदारी राहणार