छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य महाराष्ट्रात येण्यासाठी मागील ४० वर्षांपासून संघर्ष करतोय. तूर्तास देशातील चार मोठ्या राज्यात पक्ष विस्तारला आहे. आता गणेशराव रोकडे यांच्यासारखी ताकतवान मानसं रासपात येत असल्याने माझा ऊरं भरून आलाय. रासपची वाढलेली ताकत पाहून महाराष्ट्रात विधानसभेच्या ५० जागा लढविणार असून त्यापैकी २५ जागांवर यश मिळेल, अशी खात्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली.
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रासपमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम शनिवारी (दि. २६) पालम तहसील कार्यालयासमोर झाला. प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, जि.प. सदस्य किशनराव भोसले, प्रल्हाद मुरकुटे, युवक आघाडीचे अध्यक्ष राजेभाऊ फड, राजेश फड, नगरसेवक सचिन देशमुख, रासप जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, पूर्णा व पालम प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष नारायण दुधाटे, हनुमंत मुंडे, राधाकृष्ण शिंदे, लक्ष्मण मुंडे, सत्यपाल साळवे, अशादुल्लाखा पठाण,उबेरखाॅ पठाण, मोबीन कुरेशी,अजीम खाॅ पठाण,रहीमदुल्लाखाॅ पठाण,गौस शेख,गौस कुरेशी यांच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.गणेश रोकडे म्हणाले कि मी मागील २०वर्षापासून भाजपात काम करीत होतो.सत्ता नसतांना संघर्ष केला. भाजपामध्ये काम केला त्यावेळी भाजपला पालममध्ये ओळख नव्हती.मात्र आता यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे काम करणार असल्याचे रोकडे यांनी म्हटले आहे.त्वपुर्वी त्यांनी,भाजप खरेदी विक्री संघ,सहकार क्षेत्रातील ९००कार्यकर्त्यासह रासपात प्रवेश केला.त्याच्यासह प.स. सदस्य माधवराव गिनगिने,खरेदी संघाचे डॉ.रामराव उंदरे,नगरसेवक बाळासाहेब रोकडे, गजानन रोकडे, तुकाराम पाटील, राजेश निरस्कर,विजय घोरपडे,कंदील शेख रशीद शेख व मातब्बर नेत्यांनी यावेळी रासपात प्रवेश घेतला.
गणेशराव रोकडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार..आ.रत्नाकर गुट्टे
आ. रत्नाकर गुट्टे म्हणाले की, गणेशराव रोकडे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षात काम करणार आहे. शिवाय, रोकडे यांचा अनुभव पक्षाच्या कामाला येणार आहे. आता आगामी जिल्हा परिषद निवडणूक अवघड जाणार नाही. रासपच्या पाठबळाशिवाय परभणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही. नुकत्याच झालेल्या पालम नगरपंचायत निवडणुकीत एकत्र लढलो असतो तर रासपची सत्ता आली असती. आम्ही दोघे वेगवेगळे लढलो म्हणून तिसऱ्याचा फायदा पालम नगरपंचायत निवडणुकीत झाला. आता रोकडे यांच्या मागे एवढ्या ताकतीने उभा राहणार आहे, तेव्हा समोरची ताकत शिल्लक राहणार नाही. आम्ही दोघे एकत्र काम करून अशी कबुली आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिली.