मुंबई:-पालघर तालुक्यातील मनोर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे दोनदिवसीय अधिवेशन पर पडले. अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर,माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल अक्कीसागर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आम्ही आमचा पक्ष बळकट करण्याचे काम हाती घेतले आहे.एकीकडे या भारतातील काॅग्रेस पक्ष गांधीवादावर चालते.शिवसेना भाजप ही जातीवादावर चालते , राष्ट्रवादी काँग्रेस हे घराणे वादावर चालत असून राष्ट्रीय समाज पक्ष हा राष्ट्रीय समाजाच्या मानवतावादावर चालत आहे.घराणेशाही,जातीयवाद,नष्ट करण्यासाठी देश्यात मानवतावाद आणणार "सब समान तो देश महान"असे उदगार
महादेव जानकर यांनी यावेळी केले.
सर्व धर्मियांना राजकीय, सामाजिक, आर्थिक भागीदारी सामान मिळाली पाहिजे या विचाराने आमचा पक्ष पुढे जाणार आहे. आज सर्व स्तरावर जातीभेद रोवला जातोय धर्मवाद केला जातोय,दंगली घडवल्या जातात हे कुठे तरी थांबून मानवतावाद पुढे आणण्याचे काम आमच्या पक्षातील राष्ट्र प्रमुख,अल्पसंख्यक आघाडी मच्छिमार आघाडी, वकील आघाडी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व आघाडीचे नेते करणार आहेत. असे पत्रकार परिषदेत जानकर म्हणाले. पुढे जाऊन काँग्रेस आणि भाजपला प्रयाय आम्ही देऊ हे आमचं पुढचं संशोधन असणार आहे. कारण काँग्रेसची सत्ता आली तर तो गांधी घरण्यातला पंतप्रधान आणि भाजपचा आला तर आर एस एस मधून पंतप्रधान करायचा ही प्रथा बदलायला पाहिजे सर्वसामान्यांमधला पंतप्रधान व्हावं ही आमची अपेक्षा आहे. असं बोलून जानकर यांनी दोन्ही पक्षांवर ताशेरे ओढले. उचवर्गिय, आदिवासी, ओ बीसी, मुस्लिम, ख्रिश्चन, मागासवर्गीय सर्व समाजासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. सर्व धर्मियांना सोबत घेऊन आमचा पक्ष बळकट करणार आहोत. असे दोन दिवसीय शिबिरात महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.