▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

गडचांदुरचा "कीडीया" आयपीएल online व्यवसायात ही सक्रीय ?
कोरपना (प्रति.)
गडचांदूर शहरात उद्या गांधी जयंती दिनी आशुतोष ढोके या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन "गडचांदूरात तंबाखू ban" साठी रॅलीचे आयोजन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचांदूर शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री करणारे चार-पाच मुख्य विक्रेते आहेत. यातील " आशीफ कीडीया" नावाचा मुख्य विक्रेता हा मागील अनेक वर्षांपासून गडचांदूर शहरामध्ये बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री मध्ये सक्रिय सहभागी असून विश्वस्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडचांदूर चा हा "किडीया" नामक व्यापारी आयपीएल ऑनलाईन सट्याच्या betting मध्ये सक्रीय असून lockdown काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची विक्रीतून पोलिसांना "अंडा" दाखवत करोडोंची माया या "किडीया" ने कमविली आहे. आपल्या लाभासाठी विविध पक्षात प्रवेश करणे, स्वतःचे मोठमोठे बॅनर लावणे हा या "किडीया" चा छंद आहे. हा "किडीया" कधी कोणत्या पक्षात राहील याचा नेम नाही.असा स्पष्ट आरोप ढोके शिक्षकांनी केली आहे. आयपीएल ऑनलाईन सट्ट्यावर नुकतीच गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.