चंद्रपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी पक्षाच्या वाढीसाठी जुनी कार्यकारणी बरखास्त केली व नवी कार्यकारिणी घोषित करण्याचे आदेश पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार डॉ रत्नाकर गुट्टे व अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष व मुख्य महासचिव बाळासाहेब दोरतले यांना देण्यात आले. त्यानुसार राज्याच्या कार्यकारिणीत फेरबदल करून नव्याने कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.
विदर्भामध्ये पक्षाच्या वाढीसाठी लक्ष केंद्रित करण्यात आली असून विदर्भ अध्यक्षांची धुरा गडचिरोलीचे जि. प. सदस्य अतुल गण्यारपवार व नागपूरचे ॲड. मनोज साबळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विदर्भ अध्यक्षांच्या या नियुक्तीमुळे पक्ष वाढीस चालना मिळणार असून त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे व उत्साह निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष आजघडीला समाजकारण आणि राजकारणात उंच भरारी घेत आहे. सध्या पक्षाचे दोन आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका व अनेक ग्रामपंचायत मध्ये सत्ता काबीज केली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात,आसाम, उत्तरप्रदेश, कर्नाटक व इतर अनेक राज्यांत सत्तेत आहे. रासप येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे.त्यामुळे पक्षाचे ध्येयधोरणे व पक्ष विस्तारीकरण करण्यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी संपुर्ण महाराष्ट्राची कार्यकारिणी बरखास्त केली व नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.