महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या जिवती तालुकाध्यक्ष पदी शब्बीर सय्यद यांची नियुक्तीजिवती: महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या जिवती तालुकाध्यक्ष पदी साप्ताहिक लोकशाही भारत चे मुख्य संपादक शब्बीर सय्यद यांची नियुक्ती पुर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे शब्बीर सय्यद हे चंद्रपूर का रहेबर या पोर्टल मध्ये लिहितात त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून जिवती तालुका कार्यकारिणी चा लवकरच विस्तार करणार असल्याची माहिती वरिष्ठांना दिली आहे.जिवती तालुक्यातील प्रिंट मीडिया, न्यूज पोर्टल, युट्यूब चॅनलशी संबंधित पत्रकार बांधवांना महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघांची सदस्यता स्विकारावी असे आव्हान शब्बीर सय्यद तालुकाध्यक्ष यांनी मीडियाच्या माध्यमातून केली आहे.यांची सामाजिक व मीडिया क्षेत्रात अग्रेसर कामगिरी असल्याने शब्बीर सय्यद यांची जिवती तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकार बांधव आणि मित्रमंडळी इतर मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे