मुळावार यांनी MBA चे बोगस प्रमाणपत्र दिल्याने जिल्हा आरोग्य विभाग धोक्यात !



चंद्रपूर प्रतिनिधी :- राष्ट्रीय आरोग्य अभियान चे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीनिवास मुळावार यांची पदभरती कंत्राटी पद्धतीवर सन २०११ ला करण्यात आली. पदभरती करतांना व्यवस्थापक पदाकरीता MBA ची डिग्री अनिवार्य असल्याने श्रीनिवास मुळावार यांनी सन २०११ ला MBA चे बोगस प्रमाणपत्र तयार करून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदावर मिळविल्याचे निलेश हिवराळे यांनी माहीतीचा अधिकारातुन उघडकीस आणल्याचे सांगितले आहे. १५आॅगष्ट रोजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे चंद्रपूर जिल्हा दौ-यावर आले असतांना त्यांना संपुर्ण पुराव्यानिशी मुळावार यांच्या भ्रष्टाचारांची आपबिती सांगून प्रत्यक्षात चर्चा करण्यात आली असून शासनाची फसवणूक केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करून सन २०११ ते आजपर्यंत त्यांनी उचल केलेला पगार व्याज्यासह शासनास परत करावे, मुळावार यांच्या काळात झालेली पदभरती रद्द करावी,त्यांच्या काळात झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारात झालेल्या भ्रष्टाचारांची चौकशी करून भा.द.वी.नुसार गुन्हा नोंद हमी देण्यात आल्याचे हिवराळे यांनी सांगितले.
मुंबई येथील पदभरती झालेल्या कार्यालयात माहितीचा अधिकारातून माहीती मागीतली आहे.त्यात श्रीनिवास मुळावार यांची mba चे प्रमाणपत्र बोगस असून त्यात authorized study centre MIT Pune असा उल्लेख असल्याचे दिसून येत असून ते प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सन२०१९मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती घेण्यात आली तर या निवड समितीत सदस्य सचिव म्हणूनही श्रीनिवास मुळावार हे होते.मुळावार यांनी ज्या उमेदवारांकडून आर्थीक देवाणघेवाण केले त्या उमेदवारांना एकसारखे गुण देऊन त्यांची निवड करण्यात आली.जे उमेदवार तर या पदाकरीता पात्र असतांनाही त्या उमेदवारांना हेतुपुरस्सरपणे डावलण्यात आले.या पदभरतीत लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. श्रीनिवास मुळावार यांच्या भ्रष्टाचाराची वारंवार निवड समितीतील जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यांना तक्रार दिल्यानंतर ही मुळावार यांची पाठराखण करीत आहेत.वरीष्ट अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असतानासुद्धा कुठलीही चौकशी करण्यात आली नसल्याचा गंभिर आरोप त्यांनी केला आहे.मुळावार यांच्या भ्रष्टाचारांची संपुर्ण पुराव्यानिशी तक्रार दि.२०/११/२०१९ ला मुख्य सचिव गृह विभाग,प्रधान सचिव आरोग्य सेवा , आयुक्त (कु.क.) अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई, महासंचालक पोलिस विभाग, पोलिस अधीक्षक चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आले आहे.मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.