शासकीय आश्रमशाळा व्येंकटापुर येथे जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


गडचिरोली : - अहेरी तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या व्येंकटापुर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासींमध्ये आत्मसन्मान व विश्वास प्रस्थापित करणारे आद्य क्रांतिकारक महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून शालेय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वंसता आत्राम , सदस्य बालाजी आत्राम , मुख्याध्यापक एस. ए. नन्नेवार , महिला अधीक्षिका /अधिक्षक एस. एम. वाघमारे तसेच बी. एस. आत्राम इत्यादी कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.