मी नाही वनरक्षक रामटेके यांनी घोळ केल्याचा आडकिने यांचा निर्वाळा !


सामाजिक वनीकरण विभाग भाग १
सिदेंवाही : 17 जुलै रोजी चंद्रपूर क्रांती ने "बँकेत जमा झालेले पैसे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मागितले परत!" या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यामध्ये सिंदेवाही चे वनपरिक्षेत्र अधिकारी आडकिने यांचा प्रताप,
वनमजूरांची मजुरी बॅंकेतून काढून आपले कमिशन काढल्याचा मजूरांचा आरोप या आशयाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर आडकीने यांनी आपल्याला काही तरी गैरसमज झालेला आहे हा घोळ माझ्याकडून नाही तर वनरक्षक रामटेके यांच्याकडून झालेला असल्याच्या निर्वाळा भ्रमणध्वनी द्वारे संपादकांना देत काही तरी प्रकार घडल्याची अस्पष्ट कबुली दिली.
महत्वाचे म्हणजे सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून सिंदेवाही तर प्रभारी म्हणून मुल-सावली चे पद डी. आर. आडकिने यांचेकडे आहे. एका गावातील आठ ते दहा वनमजुरांची मंजुरी त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते, परंतु नंतर ती काढून आपले कमिशन घेण्यात आले, असा आरोप होत आहे. सिंदेवाही, मुल व सावली तालुक्यातील भागात हा प्रकार घडला असून यासंबंधातील जवळपास आठ ते दहा मजुरांनी त्यांच्या बँकेचे पासबुक व त्यात जमा झालेली रक्कम तसेच काढण्यात आलेली तारीख याच्या पुराव्यानिशी कागदपत्रे चंद्रपूर क्रांतीला सादर केले आहेत. खळबळजनक बाब म्हणजे प्लॅटेशन (रोपवाटिका) झालीचं नाही, फक्त काही वनमजूरांना तुमचे बॅंक पासबुक ची झेरॉक्स द्या, तुम्हाला त्यासाठी आम्ही काही रक्कम देऊ, बॅंकेत जमा झालेली रक्कम आम्हाला परत द्या, असे सांगून ही रक्कम घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या या लाॅकडाऊनंतर शासनाने कोणतीच कामे किंवा योजना अंमलात आणली नाही तर कोरोनाच्या सावटात कोणती कामे करण्यात आली हे वनपरिक्षेत्र अधिकारी आडकिने यांनीचं सांगावे. कोणत्याही कामाला आम्ही गेलोच नाही अन् अशी रोपवाटिका बनलीचं नाही, असे स्पष्टपणे वनमजूर सांगत आहेत, सिंदेवाही सामाजिक वनीकरण चे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. आर. आडकिने मात्र हा घोळ वनरक्षक रामटेके यांनी केला असून आपला त्यात सहभाग नसल्याचे सांगत असून वनमजूरांना मात्र आडकिने हेच खात्यातील रक्कम परत मागीत असल्याचे मजूरांनी आम्हाला सांगीतले असून त्याबद्दल चे पूरावे ही पाठविण्यात आले आहे. हा घोळ फक्त एका भागातील नसून बऱ्याचशा ठिकाणी असाच प्रकार घडला आहे, हे यातून स्पष्ट होत आहे.
एकीकडे संपूर्ण देश कोरोना च्या महामारी पासून झगडत असताना वन विभागामध्ये सुरू असलेला हा भोंगळ कारभार आणि शासनाच्या पैशाच्या दूर्व्यहार ही बाब अत्यंत शरमेची आहे. याची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणे गरजेचे आहे. चोरी आडकिने केली काय? किंवा रामटेके ने केली काय? चोरी झाली हे महत्वाचे पैशाची अफरातफर झाली त्याचा तपास वरिष्ठ स्तरावर व्हायला हवा.