▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

आयुष हेमंत ढोले यांचे बारावीत ९१.८नी सुयश


चंद्रपूर : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक बारावी बोर्डाच्या परिक्षेत डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर या विद्यालयाचा विद्यार्थी असलेला आयुष हेमंत ढोले यांनी ९१.८०% गुण मिळवून मोठे यश प्राप्त केले.या यशाबद्दल आयुषचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
नागपूर येथील प्रसिद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने गौरवास्पद परंपरा याहीवेळी कायम राहिली.विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.आयुषनी गणितात १००पैकी१०० गुण मिळवीले आहे, भौतीक शास्त्र ९१, केमिस्ट्री९२, इलेक्ट्रॉनिक विषयात १८३ तर इनव्हीरामेंट एज्युकेशन मध्ये त्यानी ५० असे एकुन ५९८गुण पटकावले आहे.आयुषचे वडील हेमंत वसंतराव ढोले हे चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अतिरीक्त कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्याने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य आणि सर्व विषयाच्या शिक्षकासह आई सौ. कल्पना हेमंत ढोले,आजोबा वसंतराव ढोले
आजी सौ. निर्मलाबाई वसंतराव ढोले यांना देत आहे. आयुषचे भविष्यात युपीएसई करून अभियंता होऊन सेवेत येण्याची स्वप्नं आहेत.