राज्य महामार्ग असलेल्या जिल्ह्यातील खेडी-गोंडपिपरी हा महामार्ग गेलेल्या अनेक वर्षांपासून खोदकाम करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावर अनेक अपघात झाले असून जिवितहानी सुध्दा झालेली आहे, मात्र या महामार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने खड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हे कळेनासे झाले आहे. या रस्त्याचे कंत्राटदार यांच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या असून ही कंत्राटदार यावर गंभीर नाही. आत्तापावेतो या रस्त्यावर झालेल्या अपघातात प्राण गमावण्याचे दोषी मानून कंत्राटदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सावली, मुल, गोंडपिपरी हे तिन तालुके या महामार्गाला जोडलेल्या गेले आहेत. या महामार्गात येणाऱ्या तिन्ही तालूक्याचे प्रतिनिधीत्व वेगवेगळे आमदार करीत आहेत. त्यात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात येणारे सावली तालुक्यातील खेडीचे आमदार सध्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येणारे मुल तालुक्याचे आमदार माजी अर्थमंत्री व वनमंत्री सुधिर मुनगंटीवार हे आहेत. तर राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे हे आहेत. सध्या दोन आमदार सत्ताधारी तर एक विरोधी पक्षात आहेत. माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात या महामार्गाचे नुतनीकरण करण्याचे काम या कंपनीला कोट्यावधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. मात्र या कंपनीने फक्त रस्त्याचे खोदकाम करून अपघाताला आमंत्रण दिले आहे. रस्ताच्या बाजुचे हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या रोडवर मोठं मोठे खड्डे पडल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे.या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून अनेकांना जिव गमवावा लागला. आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.