गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे हे स्थानिक राजकारण-समाजकारण(?) चा "टार्गेट" तर होत नाही नां?



(गोंडपिपरी विशेष) : चंद्रपूर जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यापैकी एक गोंडपिपरी पोलीस ठाणे आहे. या पोलिस ठाण्यात 28 जून 2019 ला संदिप धोबे नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पदभार सांभाळला. आजच्या स्थितीत अवघ्या 11 महिन्याचा कार्यकाळ त्यांना त्या ठिकाणी होत आहे. त्यातीलच मागील तीन महिने हे कोरोना संचारबंदीचा कार्यकाळ म्हणून गिनती केली तर अवघ्या 9 महिन्याच्याचं क्रियाशिल असा बोलका कार्यकाळ या पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा झाला आहे. या कार्यकाळात स्थानिक राजकारण-समाजकारण (?) यांच्या अस्तित्वात धोबे टार्गेट तर होत नाही नां! अशी चर्चा गोंडपिपरी सोबत अन्य भागातही होत आहे. हा विषय चर्चेचा कारणही तसेच आहे.

गोंडपिपरी पोलीस ठाण्याची जिल्ह्यामध्ये वेगळ्या ओळखीचे कारण ही आहे. ज्यावेळी दारू तस्करांचा जिल्ह्यात धुमाकूळ होता, त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यात गोंडपिपरी पोलिस ठाण्याला प्रविण बोरकुटे या ठाणेदाराच्या कार्यकाळात "एक बुंद ही दारू न मिळणारा परिसर" असा नावलौकीक जिल्ह्यात झाला होता. 30 पेक्षा जास्त आणि 40 पेक्षा कमी पोलीस कर्मचारी असलेले गोंडपिपरी पोलीस ठाणे! नायक असलेला ठाणेदार आपला वचक बसविण्याची पूर्ण दारोमदार त्याच्या शिपायांवर अवलंबून राहते. तेच बहुतेक बोरकुटे यांना हाताळता आले आणि धोबे यांना हाताळता आले नाही म्हणूनच स्थानिक राजकारण-समाजकारण (?) यांच्या अस्तित्वात धोबे टार्गेट होत असल्याचे आज त्याच परिसरात बोलल्या जात आहे. अत्यंत अल्पावधीत लाभलेल्या धोबेंवर वेगवेगळे आरोप होत आहे, होणारे आरोप ही सरळ ठाणेदारांवर न होता, संतोष काकडे, देवेश कटरे, प्रफुल्ल कांबळे या तीन पोलिस शिपायांवर होत आहे. हे पोलिस शिपाही मागील जवळपास तीन वर्षापासून या पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. त्या खेपेचे बोरकुटे यांचे खासमखास म्हणून या शिपायांची गिनती त्यावेळी होत होती. आजही ते गोंडपिपरी येथेच कार्यरत आहेत.
दारू तस्कर, रेती तस्कर, चोर बिटी तस्कर इत्यादींची इत्यंभूत माहिती असलेले हे तीन सिपाहसलार आज गोंडपिपरी पोलिस स्टेशन येथे "टाईट कॉलर" पणे आपले कर्तव्य बजावत आहेत आणि आरोप ही त्यांचेवरचं होत आहे आणि ठाणेदार संदिप धोबे यांना मधात गोवून हे आरोप होत आहेत, हाच खरा याठिकाणी संशोधनाचा व पोलिस तपासाचा विषय आहे.
कोरोना स्थितीत गरजूंना मदतीचा हात देण्यात गोंडपिपरी पोलिस प्रशासन कुठेच कमी पडत नसल्याचे आज चित्र आहे. याच दरम्यान परप्रांतीय नागरिकांना अन्न धान्याच्या शेकडो किड वाटपासोबतचं तालुक्यालगत तेलंगणा राज्य असल्याने राज्यसिमेसह आडमार्गावर पोलिसांची सातत्याने पाळत राहिली.याच दरम्यान नागरिकांच्या जाणीव जागृतीसाठी "मॉकड्रिल" सारखे उपक्रम राबविले.संचारबंदीच्या या काळात आवश्यक खबरदारी घेतली.या नंतर परराज्यातून नागरिकांची ये-जा सुरू झाली.हजारो मजुरांचे लोंढे राज्यात परतू लागले.तेलंगणातून पोडसा पुलियावर आलेले हे मजूर धाबा - गोंडपिपरी मार्गे स्वगृही जात होते. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांनी हाताळला.एवढेच नाही तर मुल तालुक्यातील महिला आजारी पती आणि लहान मुलाला घरी ठेऊन मिरचीच्या हंगामासाठी तेलंगणात गेली.मात्र कडक ताळेबंधीमुळे ती तिथेच अडकली.दरम्यान आजाराने त्रस्त पतीचे निधन झाले.तिच्यावर आभाळ कोसळल्यागत स्थिती उद्भवली.पतीचे अंत्यदर्शन देखिल तिच्या नशिबी आले नाही.इकडे लहान मूल आईविना कासावीस झाले.आईसाठी गयावया करू लागला.तर तिकडे आईने घरी येण्यासाठी टाहो फोडला.ही करूण कहाणी ठाणेदार धोबे यांना समजली. त्यांच्यातील हळवा माणूस जागा झाला.स्वतः पुढाकार घेत त्या महिलेला तेलंगनातील खंमम जिल्ह्यातून आणून ठाणेदारांनी घरी सोडले.गोंडपिपरी ठाण्याच्या हद्दीबाहेरिल व्यक्तीसाठी देखिल त्यांनी कर्तव्यापलीकडची सामाजिक बांधिलकी निभावली.रोजगारानिमित्त तालुक्यात आले,मात्र ताळेबंधीत अडकले,अश्यांसाठी ठाणेदारांनी दैनंदिन गरजेच्या वस्तू वाटण्याचे समाजकार्य धोबे यांच्या नेतृत्वात याठिकाणी करण्यात आले. विरोधासाठी विरोध करणारे मात्र या ठिकाणी कमी नाही. जागतिक महिला दिनी धोबे यांच्या सौभाग्वतींनी पुढाकार घेत सुशिक्षीत महिलांसोबत पारंपारिक पेहरावात जागतिक महिला दिनाच्या जनजागृती संदर्भात काढलेल्या रॅलीला ही काही कपाळकरंट्यांनी स्व-स्वार्थापोटी नावे-बोटी ठेवली. महत्त्वाचे म्हणजे गोंडपिपरी मध्ये अशा पद्धतीने महिलांनी काढलेली ही पहिलीचं रॅली असल्याचे तेथील सुज्ञ नागरिक चर्चा करतात. चांगल्या कामात "संकष्ट" येतचं असतात. त्याला सामोरे जाऊन धोबे कर्तव्यासोबत आपले सामाजिक कार्य ही जोमाने पार पाडीत आहेत, आज ना उद्या वरिष्ठ स्तरावर त्यांच्या या कार्याची अवश्य दखल घेतल्या जातील,हे ही निश्चीत आहे.


( काही दिवसांपासून मोबाईलमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे आपल्यापर्यंत बातम्या प्रसारित करु शकलो नाही.काही वाचकांचे फोनव्दारे बातम्या प्रसारित होत नसल्याची विचारणा करण्यात येत होती.त्यामुळे मनस्वी आपल्या सर्व वाचकांचे मनापासून आभारी आहे.बातम्या प्रसारीत होऊ न शकल्याने आम्ही दिलगीर आहोत.)                संपादक