शिक्षणधिका-यांच्या उपस्थितीत यंग चांदा ब्रिगेड व शिक्षण संस्थांची बैठक संपन्न*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शुल्कात सुट देण्यात यावी, याकरीता खाजगी शिक्षण संस्थांच्या संचालकांची बैठक लावण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्या होत्या याची दखल घेतली आहे. परिणामी काल शुक्रवारी शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांच्या उपस्थितीत यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी व खाजगी शिक्षण संस्थांच्या संचालकांची बैठक पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण शुल्कासाठी सक्ती केल्या जाणार नाही असे निर्देश शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी खाजगी शिक्षण संस्थांच्या संचालकांना दिले आहे. या बैठकीला यंग चांदा ब्रिगेडचे शिक्षण विभाग प्रतिनिधी प्रतिक शिवणकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी संघटीका वंदना हातगावकर, डॉ अभिलाषा गावतूरे यांच्यासह जवळपास सर्व खाजगी शिक्षण संस्थांच्या संचालकांची उपस्थिती होती.
संपुर्ण देशासह चंद्रपूरातही कोरोनाच्या विषाणू रोध्ररुप धारण करु पाहत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने उपाय योजना केल्या जात आहे. रोज नवे निर्देश दिल्या जात आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता ठरावीक वेळेसाठी शहरातील बाजारपेठही सुरु करण्यात आली आहे. असे असले तरी १४४ कलम लागू असून संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. याचा फटका रोजनदारीने काम करुन आपल्या परिवारास उदरनिर्वाह करणा-या कामगारांना बसला या कामगारांचा रोजगार बंद असल्याने त्यांच्यापूढे आर्थिक संकट उभे झाले आहे. अशातच शालेय सत्र सुरु होत असल्याने शालेय शुल्क भरण्यासाठी खाजगी शाळा, कॉन्व्हेंट, महाविद्यालय पाल्यांना सक्ती करत आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य सांभाळण्याचीही मोठी अडचण त्यांच्या समोर उभी ठाकली आहे. हि बाब लक्षात घेता शालेय शुल्क भरण्याची सक्ती करु नये यासाठी खाजगी शैक्षणीक संस्था व पालकांमध्ये समन्वय साधण्यासाठी बैठक लावण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना केल्या होत्या. या सुचनेवर तात्काळ दखल घेत खाजगी शैक्षणिक संस्थांचे संस्थापक व मुख्याध्यापक यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांना दिलेत त्यानूसार काल शुक्रवारी शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांच्या उपस्थितीत खाजगी शैक्षणीक संस्थांचे संस्थापक, मुख्याध्यापक व यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची बैठक पार पाडली. या बैठकीत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पालकांची बाजू मांडण्यात आली.
कोरोनाच्या संकटामूळे रोजगार केल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशात शैक्षणीक शुल्क भरायचे कसे असा प्रश्न पाल्यांसमोर असल्याचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले. बैठक अंती खाजगी शैक्षणीक संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पालकांना शैक्षणीक शुल्क भरण्याची सक्ती केल्या जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आता शालेय शुल्कासाठी कोणतेही शिक्षण विद्यार्थ्यांच्या घरी जाणार नाही असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. तसे निर्देशही शिक्षणाधिकारी डोर्लिकर यांनी खाजगी शैक्षणिक संस्थांना दिले आहे.