▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

गोंडपिपरीच्या काकडे-कांबळे-कटरे "त्रिदेव" शिपायांच्या हैरतअंग्रेज कारनामा!


गोंडपिपरी येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत तीन शिपायांनी मागील काही दिवसांमध्ये दारूविषयी केलेल्या कारवाईची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. तेलंगाना इथून रविवार दिनांक १०मे रोजी चार चाकी वाहनाने येणारी विदेशी दारूच्या २० पेट्या शहरातील भरगच्च असलेल्या चंद्रपूर रोडवरील सरकारी दवाखाना समोर सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पकडली. आता दारू विक्रेत्यांवर कारवाई होईल असे वाटत असतानाच लेन-देन च्या माध्यमातून दारू विक्रेत्याला फक्त सोडल्याच गेले नाही तर त्याच्याकडून लाखो रुपयांची देणगी या त्रिदेवांनी वसूल करून व पकडलेला दारूसाठा शहरातील दुसऱ्या दारू विक्रेत्याला परस्पर विकण्यात आला. खळबळजनक माहिती अशी आहे की सदर व्यवहाराची कल्पना गोंडपिपरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार यांनाही देण्यात आली नाही. दारू विक्रेत्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. चर्चेनुसार या व्यवहारासाठी एक लाखाच्या वरची बिदागी दारू विक्रेत्याकडून घेण्यात आली. पांढऱ्या रंगाच्या पिक अप बोलेरो मध्ये आलेला हा दारूसाठा गोंडपिपरी येथे उतरून तेथीलच एका दुसऱ्या दारूविक्रेत्याला विक्री करण्याची मजल काकडे-कांबळे-कटरे या तिन सिपाह्यांनी मारली. दरुर नंदवर्धन मार्गे या दारूची चोरटी वाहतूक झाली होती. हि दारू गोंडपिपरी येथे या तीनही शिपायांनी पकडल्याची अनेक प्रत्यक्षदर्शी आहेत. गोंडपिपरीच्या श्रीराम वार्ड येथील एका मोठ्या दारू माफियाचा हा दारूसाठा असल्याचे बोलले जात आहे. "पैशासाठी शेण खाण्याची वृत्ती" बाळगणाऱ्या या "त्रिदेव"चे अनेक कारणामे गोंडपिपरी मध्ये मोठ्या चवीने चर्चिले जातात. हे त्रिदेव चंद्रपूर मुख्यालयातून काही वर्षापूर्वी येथे बदलून गेलेले आहे. गोंडपिपरी येथे असलेले हे त्रिदेव आपले सावज टिपण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा नोंद न करता चोर मार्गावर उभे राहतात सावज टिपून आर्थिक देवाण-घेवाण करीत असल्याच्या अनेक घटना आहेत. यांच्या लाजिरवाण्या कृत्यामुळे प्रामाणिक पोलीस हैराण झाले असून पोलीस विभागाला काळीमा फासणाऱ्या या "त्रिदेवा"ची पोलीस अधीक्षकांनी दखल घ्यावी, यासंदर्भात चंद्रपुरातील पत्रकार संघ या संदर्भात निवेदन देणार आहे.