▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

खळबळजनक चंद्रपुरात मिळाला पुन्हा एक पॉझिटिव्ह!


चंद्रपूर :शहरातल बिनबा परिसरात एक कोरोना रूग्ण आढळला असून, चंद्रपूर जिल्हाशल्य चिकीत्सक निवृत्ती राठोड साहेब यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की या बिनबा परिसरात राहणारे हे कुटुंब यवतमाळ येथे मागील काही दिवसांपासून वास्तव्यास होते, रुग्णाची आईच्या एका खाजगी रुग्णालयात यवतमाळमध्ये उपचार सुरू होते. तिच्या देखभालीसाठी हे पूर्ण कूटूंब यवतमाळ येथे केले होते. ९ तारखेला हे कुटुंब चंद्रपूर येथे परत आल्यानंतर त्यांना होम कोरोनटाईन करण्यात आले होते,दि.११मे रोजी दोघांचे स्वॅब नागपूरला पाठविण्यात आले होते. आज बुधवार दि. १३ मे रोजी दोघांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव आला असून दुसऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे. यापुर्वी चंद्रपूर येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर खळबळ माजली होती. आज मिळालेल्या पॉझिटिव रूग्णाने ही संख्या दोन झाली आहे.