ना.वडेट्टीवार यांचेकडून ५हजार अन्नधान्य किटचे वाटप

चंद्रपूर व घुग्घुस येथे पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याकडून 5 हजार अन्नधान्याचे किट वाटप

रेशन कार्ड नसणाऱ्या निराश्रिताना दिला आधार


चंद्रपूर, दि. 7 एप्रिल : शासकीय रेशन दुकानातून ज्यांना अन्नधान्य मिळू शकत नाही, अशा निराश्रित व निराधार व्यक्तींना राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज 5 हजार अन्नधान्याच्या किट देऊन व्यक्तिगतरीत्या मदत केली.

      चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तहसील भवन येथे उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालकमंत्री यांच्यासह आमदार किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

       कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी याठिकाणी सामाजिक दुरी राखत अतिशय शिस्तीमध्ये वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

      ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा निराश्रितनिराधार लोकांना पुढील पंधरा दिवस या कीटद्वारे अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. कुटुंबातील अन्य सदस्यांना देखील याचा लाभ होणार आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सामाजिक दायित्व भावनेतून जिल्ह्यात अशाप्रकारे 40 हजार अन्नधान्याच्या किट वाटपाचा संकल्प केला होता. ब्रह्मपुरीसावलीसिंदेवाही या तालुक्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी रेशन कार्ड नसणाऱ्या गरीबगरजू,निराश्रितांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आले. आज सकाळी तहसील कार्यालय चंद्रपूर येथे चार हजार लोकांना अन्नधान्य वाटपाची प्रातिनिधिक सुरुवात करण्यात आली. 

    सायंकाळी घुग्घुस येथील नायब तहसीलदार कार्यालयात 1 हजार लोकांना पुरेल इतक्या अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाविषाणु प्रादुर्भाव काळामध्ये  गेल्या काही दिवसांपासून संचार बंदी असून ती पुढील 14 एप्रिल पर्यंत कायम राहणार आहे. या काळात जिल्ह्यातील कोणीही उपाशी राहणार नाही. याची काळजी घेण्याचे निर्देश यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.