▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

ना.वडेट्टीवार आणि खा.धानोरकर यांच्यात शितयुध्द! पालकमंत्री वडेट्टीवारांना घरचा अहेर!!

ना.वडेट्टीवार आणि खा.धानोरकर यांच्यात शितयुध्द! पालकमंत्री वडेट्टीवारांना घरचा अहेर!!
जगभरात कोरोनारुपी अजगराने थैमान घातले आहे. देशात कोरोनावर आळा घालण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी संचारबंदी लागू केली आहे. जनता घराबाहेर न पडता घरीच राहून कोरोना रूपी राक्षसाला हाकलुन लावणे हा हेतू आहे. त्यासाठी राज्यातील जनता उपाशी राहू नये म्हणून गोरगरिबांना अन्नधान्य जीवनावश्यक वाटण्याचे लोकोपयोगी कार्य विविध माध्यमातून करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शासकीय निधीतून जीवनावश्यक किट वाटप करण्यात येत आहे. नुकतेच खासदार बाळू धानोरकर यांनी या जीवनावश्यक किट वाटपामध्ये होत असलेल्या भेद भावासंदर्भात टीका केली. जिल्ह्यामध्ये स्थानिक विकास निधी व खनिज विकास निधीतून ४० हजार अन्नधान्य किटचे पुरवठा केला आहे. ते सर्व किट्स पालकमंत्र्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्याचे वाटप जिल्ह्यातील तहसिलदार यांना करावयाचे आहे. मात्र पालकमंत्र्यांनी स्वत:च यात हस्तक्षेप करून वरोरा व राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना कमी अन्नधान्याचे किट्स देऊन त्यांची बोळवण केल्याने वाटपामध्ये अन्याय होत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे. अन्नधान्याच्या किट्स शासकीय निधीमधून मिळाले असल्यामुळे त्याचे वाटप तहसीलदार पटवारी यांच्या माध्यमातून करण्यात यावे असे बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहे. महाराष्ट्रातील काॅग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर व राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून पुन्हा वडेट्टीवार विरुध्द धानोरकर असा सामना या भयावह परिस्थितही रंगला असल्यामुळें जिल्ह्याचे आता काय होईल, अशी चर्चा सुज्ञ नागरिकांमध्ये सूरू आहे. पालकमंत्री वडेट्टीवार हे मित्र पक्षांना विचारत नसल्याने शिवसेना, राष्ट्रवादी दूरावली असल्याचे खा.बाळु धानोरकर यांनी असाही आरोप केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ३ काॅग्रेस, ७२ हजारांची लिड घेवून किशोर जोरगेवार यांच्या रूपाने निवडून आलेले १ अपक्ष आणि २ भाजपाचे आमदार आहेत. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. मात्र शिवसेनेने अखेरीस काॅग्रेस, राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली.मात्र चंद्रपुर जिल्ह्यात "तुझे माझे जमेना, तुझ्या विना करमेना" अशी स्थिती कांग्रेस पक्षाची निर्माण झाली आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांचा विजयामध्ये खारीचा वाटा राहिला आहे. ल़ोकसभेनंतर काही काळातच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि प्रतिभाताई धानोरकर यांच्या तिकिटासाठी धानोरकर अग्रेसर होते तर वडेट्टीवार दुसर्यांना तिकिट मिळावे यासाठी प्रयत्नशिल होते. त्यातूनच ना. वडेट्टीवार व खा. धानोरकरांत विळा भोपळ्याचे नाते निर्माण झाले. महीणाभरापासून लाॅकडाऊन असल्याने सामान्य जनतेला उपासमारीचा सामना करावा लागत आहे अश्यातच सामान्य जनतेला दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी ही पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे. नव्याने सूत्रांची जुळवाजुळव करून राज्यात शिवसेना-राकाॅ- काँग्रेस असे युति झाली नवे सरकार स्थापन उद्धव ठाकरे यांच्या रूपाने पहिल्यांदा मुख्यमंत्री राज्याला लाभले. नवखे मुख्यमंत्र्याला कोरोना रुपी आलेले संकट या संकटावर मात करणे जमणार की नाही याची चर्चा होत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्या समजदारी आणि सूजबुज च्या बळावर राज्याची धुरा उत्कृष्टपणे सांभाळली आहे. पूर्वी महाराष्ट्र सुधारू त्यानंतर राजकारणासाठी अवधी पडलाच आहे अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. राज्याची स्थिती गंभीर आहे भारतामध्ये कोरोणाचे सगळ्यात जास्त बाधित महाराष्ट्रात आहे. अशा स्थितीत विरोधकांनाही सोबत घेण्याची कौशल्य मुख्यमंत्र्यांनी अंगिकारले आहे. परंतु जिल्ह्यामध्ये सत्ताधारी एकमेका समोर उभी असल्याने या "ग्रीन झोन" मधल्या जिल्ह्यात "रेड झोन" सारखी स्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांना सोबत घेऊन स्थितीत सुधारणा करण्याची मुख्यमंत्र्याची भूमिका असताना सत्ताधार्यांचे असे बेताल वागणे बरे नाही असे मात्र सुज्ञ नागरिक आता म्हणू लागले आहे.