दारू पकडली, कैलास नगर च्या त्या बार मालकाच्या आर्थिक "देवाण-घेवाणीतून" थातूर-मातूर कारवाई?
चंद्रपुर : 6 एप्रिल रोजी चंद्रपुरातील गडचांदूर येथील गाडेगाव मध्ये गडचांदूर चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या ताफ्याने सात लाखांच्या जवळपास मुद्देमालासह दारू साठा पकडला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील "तळीरामाची" काशी समजल्या जाणाऱ्या कैलासनगर येथून येणारा हा दारूसाठा आणल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कैलास नगर येथे गूरूदत्त व सनरोज बार असे दोन वाईन बार आहे. जिल्ह्यामध्ये दारूबंदी नंतर या दोन बार मधून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जिल्ह्यात पुरवठा होत होता, परंतू या दोन्ही वाईन बार वर पोलिस विभागांच्या अन्य चमुंची करडी नजर असल्यामुळे हे प्रमाण कमी झाले होते, तरी सुद्धा चंद्रपुरातील काही दारू तस्करांचे हितसंबंध जोपासत दारू तस्करीचा हा चोरटा व्यवहार या दोन वाईन बार मधून सुरू राहीला. संचारबंदीनंतर दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारुचा पुरवठा होत असून चढ्या दराने चंद्रपुरात अवैध दारू विक्रीचा व्यवहार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळत होत्या. या तस्करीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एक बडा नेत्याचा वरदहस्त असल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात पोलीस विभागाला कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सविस्तर वृत्त असे की, 06 एप्रिल ला कैलासनगर कडुन पैनंगगा कोयला खदान विरुर (गाडेगाव ) मार्गे होन्डाई कार मध्ये मँगडाल नं. वन व्हीस्की कंपनीचे विदेशी दारुच्या 1000 मि. ली. च्या 45 बंपर, 375 मिली. च्या मँगडाल नं. 1 व्हीस्की च्या 375 मिली ने भरलेल्या 15 बाटल, 180 मिली च्या 240 बाटल, बियर व दोन कार सहीत 7,34,200 /- रूपयांचा गडचांदूर येथे येणारा दारू चा जखीरा पकडण्यात आला. या दारूच्या वाहनासोबत असलेल्या TVS ज्युपीटर दूचाकी ही यावेळी पकडण्यात आली. महत्वाचे म्हणजे असलेल्या कैलास नगरातील बार मालकाला पंधरा लाख रुपये घेऊन जागेवरच सोडण्यात आल्याचे व तपासातून बाहेर ठेवण्याची खमंग चर्चा गडचांदूर शहरात होत आहे. हा सौदा गडचांदूर पोलिस विभागामधील मध्यस्ताच्या मदतीने झाला असून एवढा मोठा व्यवहार करणारे ते भ्रष्ट पोलीस कोण ! या चर्चेला पेव फुटल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे या प्रकरणात लक्ष वेधल्यामुळे भ्रष्ट व बेईमान पोलिस अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
या प्रकरणात आरोपी संपत समय्या चारुपाका, सोनल भानुदास बेलके, रा. घुग्घस, फरार कार चालक राजु कटकुरी रा. घुग्घस यांचे विरुद्ध कलम 65 (ई), 83 महादाका अन्वये गुन्हा नोद करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे आर्थिक व्यवहारातून मुख्य आरोपीला मात्र या अटकसत्रात जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्यात आले. गडचांदूर येथे येणारा हा दारूसाठा कैलासनगर येथील एका बार मालकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्ण कारवाईनंतर ही हा बारमालक पोलिसांच्या तपासात नसल्यामुळे याठिकाणी अर्थपूर्ण देवाण-घेवाण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या म्हणणे आहे. या दारू तस्करीत मुख्य भूमिका निभावणारा कैलास नगर येथील हा बारमालक या कारवाईतून बाहेर राहणे हे बरेच काही सांगून जाणारे आहे? संचारबंदी नंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पकडण्यात आलेला हा सगळ्यात मोठा दारूसाठा आहे. संचार बंदीनंतर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे जिल्ह्यातील नागरिकांनी काटेकोरपणे पालन केले आहे. या दारू तस्करीत सामील असलेल्यांनी या नियमांचे उल्लंघन केले त्यांच्यावर संचारबंदी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात यायला हवी होती. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या तस्करी मध्ये समावेश असलेल्या मुख्य सूत्रधाराने प्रत्यक्ष बोलणे केल्यानंतरच सूत्रधारांना बाजूला सारत योजनाबद्ध रित्या काही आरोपींवर कारवाई करण्यात आली. यासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी स्वतः या प्रकरणाकडे लक्ष देऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी आता होऊ लागली आहे. संचारबंदी नंतर यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी दारूची तस्करी करणाऱ्या बारचे परवाने रद्द करण्याची प्रशंसनिय पाऊल उचलले आहे.
दारूबंदी नंतर जिल्ह्यात होणारी दारू तस्करी यामुळे काही बेईमान पोलिसांचे दारू तस्करांशी असलेले हितसंबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. गडचांदूर मध्ये नुकत्याच घडलेल्या या दारू तस्करीत ते जुने संबंध तर जोपासले गेले नाही नां? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मागील एक वर्षापासून गडचांदूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून गोपाल भारती कार्यरत आहेत. वसुली अधिकारी म्हणून कुप्रसिद्ध असलेले एक इसम गडचांदूर पोलिस चौकीला कार्यरत आहेत. याच इसमाच्या मध्यस्थीने हा व्यवहार झाल्याचे दबक्या स्वरात बोलले जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दारू तस्करीतील मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल करून तस्करी झालेल्या कैलास नगर येथील त्या बारचा परवाना रद्द करण्यासाठी पाऊल उचलावे, असे निवेदन पत्रकार संघाच्या माध्यमातून गृहमंत्रालयाला देण्यात येणार आहे.
लाॅकडाऊननंतर संपूर्ण देशामध्ये अपराधांची संख्या कमी झाली, तशी चंद्रपूरमध्ये ही या संख्येत कमालीची घट झाली आहे. संपूर्ण पोलीस विभाग संचार बंदीच्या कार्यात मग्न आहे. कोरोना पार्श्र्वभूमीवर लोकांनी घरात रहावे, यासाठी कुठे गाणे गाऊन, कुठे हात जोडून तर कुठे फुले देऊन "सलाम ठोकावा" असेच नाविण्यपुर्ण कार्य महाराष्ट्र पोलिस विभागाचे राहिले आहे. चंद्रपूर जिल्हा ही त्यात मागे राहिला नाही. एखादा अपवाद वगळता अपराध घडलेच नाही अशी स्थिती आज जिल्ह्यात आहे. संचारबंदी पूर्वी च्या मागील चार वर्षाच्या काळात फक्त दारूबंदीच्या केसेस जिल्ह्यामध्ये घडत होते, बाकी अपराधामध्ये झालेली घट हे चंद्रपूर पोलिसांचे यश होते.
(भाग -1)