धनगरांच्या राजकीय अस्मितेचा दीपस्तंभ आ. महादेव जानकर*


डॉ प्रभाकर लोंढे यांनी मा. महादेव जानकर साहेब यांच्यावर लिहीलेल्या सुंदर लेख.
महाराष्ट्राची भूमी सर्वच परीने समृद्ध असली तरी तेथील सामाजिक- राजकीय परिस्थिती ही एखाद्या मेंढपाळाच्या मुलाला राजसत्ता व स्वयंभू राजकीय अस्तित्व निर्माण करता येईल, एवढी प्रगल्भता येथील सामाजिक मानसिकतेमध्ये नाही. अशा परिस्थितीत कोट्यावधी संख्येने असलेल्या धनगर जमातींमध्ये प्रस्थापितांचा विरोध पत्करून राजकीय अस्मिता जागृत करणे. यासाठी स्वतःच्या खाजगी जीवनाची तिलांजली देणे, व आहोरात्र समाजामध्ये धनगर बेड्यांवर, उपेक्षित वाड्या-वस्त्यांवर जावून राजकीय​ सत्तेतील वाटा मिळविण्यासाठी अस्मिता जागृत करणे, धनगर सोबतच समाजातील उपेक्षित जाती जमातींना​ राजकीय अस्तित्व मिळवून देण्यासाठी सर्व उपेक्षित बहुजनांची मोट बांधणे, प्रस्थापितांची बरोबरी करता येईल, प्रस्थापितांना शह देता येईल, यादृष्टीने स्वतःचा एक राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करणे व महात्मा फुलेंच्या विचारावर आधारित राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा पक्ष स्थापन करून राजकारणात सक्रिय सहभागी होणे असा एक खडतर यशस्वी ज्यांचा प्रवास आहे. या *सर्व बाबींना खंबीरपणे न्याय देणारं व्यक्तीमत्व म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माननीय महादेव जाणकार साहेब!!!!!*
आज त्यांचा वाढदिवस!वाढदिवसा निमित्ताने आमच्या लोंढे परिवाराकडून व समस्त धनगर बांधवांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा!
त्यांनी फुलेवादावर आधारित राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी करुन *डिमांडर बनण्यापेक्षा कमांडर बनण्याचा संदेश बहुजनांमध्ये पेरला.* समस्त बहुजन तरुणांमध्ये राजकीय सत्तेची स्वप्ने निर्माण केली. प्रस्थापित पक्ष व नेत्यांकडे *छोट्या मोठ्या उमेदवारी साठी वर्षेनुवर्षे उंबरठे झिजवत वय घालविणाऱ्या नेते कार्यकर्त्यांना हक्काचा राजकीय पक्ष दिला.यामध्ये अनेक कार्यकर्ते कामाला आले असतील. हा पक्ष अनेक कार्यकर्त्यांच्या कष्टाचा परिपाक असला तरी महादेव जानकर साहेबांच्या नेतृत्वाचा तो परिणाम असल्याचे मान्य करावेच लागेल.* सुरुवातीला फुलेवाद व माननीय कांशीरामजींच्या सहवासातून झालेल्या संस्कारांमुळे त्यांनी शाहू-फुले-आंबेडकर, उपेक्षितांचा राजकीय उद्धार या बाबींवर आपल्या पक्षाची कार्यप्रणाली व जाहीरनामा निर्धारित केला परंतु राजकारणामध्ये एवढं करूनही पक्षाची बांधणी व राजकारणात अपेक्षित यश येत नसल्याने तत्त्वांशी तडजोड करून आदरनीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहावरून भारतीय जनता पक्ष या परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षाशी युती केली. महाराष्ट्रात यातून त्यांच्यावर अनेक आक्षेप घेण्यात येत असले तरी या युतीमुळे पक्षाला बऱ्यापैकी प्रसिद्धी, सत्ता व मंत्रीपद मिळविता आलं. वर्षानुवर्ष कष्ट करून उभा केलेला पक्ष सत्येमध्ये आला.
अलीकडे त्यांच्यावर या संबंधाने अनेक आरोप होत असले तरी राजकीय अस्मिता निर्माण करण्यामध्ये जानकर साहेबांचा वाटा अतुलनीय आहे असे म्हटल्यास यावर आक्षेप घेतला जाऊ शकत नाही. कारण प्रस्थापित पक्षांमध्ये आपले अस्तित्व अजमावणे पेक्षा स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करून राजकीय सत्ता मिळवण्याचा आशावाद धनगर जमातीमध्ये सर्वप्रथम कृतीतून माजी मंत्री माननीय महादेव जानकर यांनीच निर्माण केलेला आहे.
             आपल्या पक्षाचा बहुजनवादी चेहरा समोर आणण्यासाठी जानकर साहेब धनगर जमातीच्या प्रश्नांस म्हणावे तसे सार्वजनिक रित्या भूमिका घेत नसले तरी त्यांना धनगर जमातींना सोडून आपला पक्ष वाढवणे शक्य होऊ शकणार नाही.  एकट्या जमातीच्या आधारे राजकारणात उतरणे कोणत्याही पक्षाला शक्यच नाही, असे असले तरी या महाराष्ट्रात जातीय समीकरणातून धनगर हा राष्ट्रीय समाज पक्षाचा हक्काचा मतदार आहे ही बाब विसरता येणार नाही. 
                      मागील निवडणुकांमध्ये धनगर जमात बीजेपी कडे असल्यामुळे धनगर मतसंख्येचा त्याकाळात राष्ट्रीय समाज पक्षाला सुद्धा मोठा फायदा झालेला आहे. त्यामुळे धनगर जमातीने जाणकार साहेबांकडून काही अपेक्षा ठेवणे हे चुकीचे नाही. परंतु पुढील काळात सुध्दा आपल्या पक्षाच्या विचारसरणीशी तडजोड करून महाराष्ट्रात तरी बीजेपी सारख्या पक्षांसोबत रहाणे राष्ट्रीय समाज पक्षाला धोक्याचे ठरू शकते ही बाब परिस्थिती पाहता लक्षात येत असली तरी.  *परिस्थितीसापेक्ष सत्तेचा मार्ग चोखाळत मराठेशाहीचा धोका ओळखून आज जानकर साहेबांची जी पाऊल पडत आहे, ती कदाचित काहींच्या नजरेतून अनपेक्षित असली तरी महादेव जानकर साहेब धनगर बहुजन समाजाचं राजकीय नेतृत्व मात्र नक्कीच करू शकतात. तेवढी क्षमता त्यांच्या विचारसरणी व कार्यशैली मध्ये निर्माण व्हावी, एवढा बळ फक्त देण्याची गरज आहे. चला साथ देऊ या! धनगरांचं राजकीय अस्तित्व निर्माण करूया!  आदरणीय महादेव जानकर साहेब मुळात "जाणकार" आहेत त्यामुळे त्यांनी घेतलेली निर्णय अतिशय प्रगल्भ दृष्टीने घेतलेले असतात या विश्वासातूनच त्यांच्या बहुजन ह्रदय सम्राट व्यक्तिमत्त्वाला जन्म दिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा !!!!!!* 

 *साहब ! प्रणाम!!*
*आप जिओ हजारो साल!!!!*

__________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*