धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची विदर्भ स्तरीय आढावा बैठक शेगाव येथे संपन्न.



शेगाव :- संतनगरी शेगाव shegaon येथे रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य ची विदर्भ स्तरिय पदाधिकारी आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पाडली.
आढावा बैठकीचे अध्यक्षस्थानी मा.अनिलकुमार ढोले, राज्याध्यक्ष हे होते.यजमान बुलढाणा जिल्हा कार्यकारणीचे वतीने आयोजित या बैठकीला राज्य उपाध्यक्ष विलासजी डाखोडे, राज्य महासचिव शरद उरकुडे, राज्य कोषाध्यक्ष उज्वल रोकडे, राज्य कार्यकारणी सदस्य नानाभाऊ पांडे हे उपस्थित होते.
तसेच बुलढाणा ,वाशीम, यवतमाळ,नागपूर, अमरावती,चंद्रपूर, गडचिरोली,अकोला येथील जिल्हाध्यक्ष/कार्याध्यक्ष, सचिव,जिल्हा समन्वयक, सल्लागार व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सभेत सर्व जिल्हाध्यक्ष/कार्याध्यक्ष यांनी आपले जिल्ह्य़ातील माहीती व अहवाल सादर केला. सभेत संघटना वाढीसाठीचे प्रयत्न, कर्मचारी व समाजातील विविध समस्या,धनगर आरक्षणातील अतिक्रमण, मेंढपाळ मोर्चा व पुढील वर्षी चे नियोजन इ. विषयावर आपली भुमिका व संकल्पना मांडली.
पदाधिकारी यांच्या कार्यअहवालानंतर संघटनेचे राज्याध्यक्ष मा.अनिलकुमार ढोले यांनी मार्गदर्शन करतांना वरिल विषयाचा आढावा घेऊन श्रमिक संघाअंतर्गत नोंदणीकृत संघटनेमुळे शासन व त्यांचे प्रतिनिधीसोबत चर्चा,शिष्टमंडळ,निवेदन इ.द्वारे येणारी अधिकृतता व त्याचे महत्व विषद केले.गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्य़ातील धनगर जमात (N.T.C)आरक्षणावरील धनगर पोटजमात (झाडे)चा नामसदृष्यतेचा गैरफायदा घेवून इतर जातीचे अतिक्रमण, अधिसंख्य कर्मचारी प्रश्ननाचे अनुषंगाने संघटनेने शासन स्तरावरून केलेल्या प्रयत्नाची व प्राप्त यशाची इतर अनेक बाबींवर सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील मुंबई उपनगर ते गडचिरोली पर्यंत नोंदणीकृत सभासद असणारी धनगर अधिकारी कर्मचारी ही समाजातील एकमेव श्रमिक संघटना असल्याचे स्पष्ट करतांना पुढील वर्षांत पदाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्य़ात जोमाने सदस्य नोंदणी करून संघटनावाढीचे काम करावे तसेच नागपूर अधिवेशनात आयोजित धनगर मेंढपाळ पदयात्रेत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
आढावा बैठकीचे सूत्रसंचालन प्राध्यापक निलेश पुंड, कोषाध्यक्ष वाशीम जिल्हा यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक समाधान गायकवाड, कार्याध्यक्ष, बुलढाणा जिल्हा यांनी केले.