गडचिरोलीत मेंढपाळांचा अदभूतपुर्व आक्रोश मोर्चा


dhangar samaj nagpur hiwali adhiveshan gadchiroli
dhangar samaj nagpur hiwali adhiveshan gadchiroli 

गडचिरोली - "बोगस झाडे हटाव, धनगर आरक्षण बचाव", "वनक्षेत्रात चराईस परवानगी द्यावी", "येळकोट येळकोट, जय मल्हार" च्या घोषणाने गडचिरोली नगरी दुमदुमली, झाडे हे बोगस धनगर असल्याने त्यांना हटवून त्यांच्यावर कारवाई करावी, वनक्षेत्रात शेळ्या मेंढ्या चराईस परवानगी द्यावी या मागण्यांसाठी धनगरdhangar समाजाचा मोर्चा गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर gadchiroli collector office मेंढ्यांसह हजारोंच्या संख्येत धडकला.

dhangar samaj nagpur hiwali adhiveshan gadchiroli 

चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील झाडे कुनबी,kunbhi झाडया, झाडी हे धनगर जमातीतील तत्सम जात "झाडे" या नामसदृश्यतेचा गैरफायदा घेत बोगस जात प्रमाणपत्र मिळवीत शासकीय नोकरी व इतर सुविधांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे खऱ्या धनगर जमातीवर अन्याय होत असल्याने त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे, धनगर समाज मेंढपाळ असल्याने चराईचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे वन क्षेत्रात चराईस परवानगी द्यावी या मागण्या घेऊन धनगर समाजाचे विविध संघटना, धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, धनगर महासंघ महाराष्ट्र राज्य, जय मल्हार सेना, अहिल्यावाहिनी, धनगर जमात संघटना चंद्रपूर, अखील भारतीय मौर्य क्रांती सेना,महाराणी अहील्यादेवी प्रबोधन मंच वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन यांचे वतीने काढण्यात आला.

dhangar samaj nagpur hiwali adhiveshan gadchiroli
dhangar samaj nagpur hiwali adhiveshan gadchiroli 


मोर्चा धनगर समाजाच्या हजारो लोकांनिशी शेळ्या मेंढ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचल्यानंतर सभेला सुरवात झाली. मोर्चेकऱ्यांना मोबाईलवरून बहुजन विकास, मागास मंत्री अतुल सावे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबोधित करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे, धनगर समाज संघरसमिती नागपूर विभाग अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार, माजी सभापती विजय करेवार, डॉ नारायण करेवार, संजय कन्नावार, डॉ यशवंत कन्नमवार, मुखरूजी ओगेवार, विस्तारीजी फेबुलवार, हरीश खुजे, हेमांतकुमार ढोले, संदीप शेरकी, साईनाथ बुचे, कृष्णां गंजेवार, रौनक फेबुलवार यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले.

dhangar samaj nagpur hiwali adhiveshan gadchiroli