रासप नेत्यांचा गंभीर अपघात,१मृत्यु तर अतुल गण्यारपवार जखमी



ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) : कामानिमित्त जात असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष नेत्यांचा ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन गावाजवळ कार आणि ट्रॅक्टर मध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी 8 वाजता दरम्यान घडली, आनंद गण्यारपवार हे या अपघातात जागीच ठार झाले तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी झाले, जखमीना ब्रह्मपुरी येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले.

गडचिरोली जिल्यातील चामोर्शी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार आणि त्याचे चुलतभाऊ आनंद गण्यारपवार हे क्रेटा क्र. एम एच 34 व्ही 245 या चारचाकी ब्रह्मपुरी मार्गे नागपूरला कामानिमित्त जात असताना ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथे त्यांच्या कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला, या अपघातात अतुल गण्यारपवार गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांचे चुलत भाऊ आनंद गण्यारपवार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, अतुल गण्यारपवार यांना ब्रह्मपुरीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, दरम्यान पोलीस व स्थानिक नागरीक अपघात स्थळी धावून गेले असून उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.