वन विभाग बघत आहे मोठी दुर्घटना होण्याची वाट?



चंद्रपूर :- महाऔष्णिक विद्युत निर्मिती केद्राला लागून असलेल्या वसाहतीजवळ एका इसमावर हल्ला करून जखमी केले असून उपचारार्थ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे उर्जानगर वसाहतीत जंगली हिंस्र प्राण्यांच्या वारंवार हमला होत असल्याने वनविभागाने तात्काळ अश्या हिंस्र प्राण्यांना जेरबंद करून या परीसरात वनविभागाचे चौकी स्थापन करावी,या चौकीत वनरक्षकासह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अश्या अनेक मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली आहे.

महाऔष्णीक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जाण्यासाठी नागपूर रोड वरून जाणारा रिंग रोड वसाहतीत जातो. या परिसराच्या दोन्ही बाजूला नाले असून जंगल व्याप्त परिसर असल्यामुळे वाघांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे.ऊर्जानगर वसाहतीच्या आजूबाजूला अनेक गाव वसलेले असून लागूनच ताडोबा जंगलाचे परिसर असल्यामुळे या भागात वाघ, बिबट,अस्वल तसेच हिस्त्रपशूचे वास्तव्य आहे.
नेहमी या भागामध्ये वाघाचे हल्ले होत असतात. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र वन विभागाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा वन विभाग कुठलीही दखल घेताना दिसून येत नाही. या अगोदर सुध्दा उर्जानगर परीसरामध्ये बिबटयाने हल्ला करुन एका पाच वर्षाच्या मुलीचा जीव घेतला.उर्जानगर वसाहतीत ये-जा करणारे कर्मचारी व ईतर रहदारी करणारे नागरीक सुरक्षीत नसल्यामुळे नेहमी दशहतीत असतात. उर्जानगर वसाहती मधील वाघ, बिबट व अस्वल यांचा वावर असल्याने त्यांना जेरबंद करण्याची उपाययोजना तात्काळ करून वनविभागाची चौकी तात्काळ देण्यात यावी.या चौकीत वनरक्षकासह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी
त्यामुळे सदर बाबीवर गांर्भीयपुर्ण विचार करण्यात यावा अन्यथा यापुढे प्राण हिंसेच्या घटना घडल्या तर वनविभागाला जबाबदार धरण्यात येईल.
तरी सदर उपरोक्त बाबीचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला.येत्या काही दिवसात वाघाचा बंदोबस्त झाला नाही तर या परिसरात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी निवेदनातुन दिला आहे.निवेदन देतांना पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे , ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खंन्नाडे, ग्रामपंचायत सदस्य अंकित ढेंगारे, शुभम आबोदकर, सौरभ घोरपडे, अभिनव देशपांडे, ऋषभ घाटे, अभिजीत मडावी, सौरभ घाटे, भाग्यवान झोडे, पवन मेश्राम, आदीची उपस्थिती होती.