चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्गावर कंत्राटदाराचा झोल !



चंद्रपूर (प्रति.) :- चंद्रपूर ते मूल या राष्ट्रीय महामार्गाचे नविन काॅक्रीटीकरणाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. या कामाचे कंत्राट अहमदनगर येथील ए. सी. शेख कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. कंत्राटदाराकडून मागील काही वर्षांपासून संथगतीने काम सुरू आहे.महत्वाचे म्हणजे हे काम निव्वळ डांबरीकरण करण्याचे नसून नवीन काॅक्रीटीकरणाचे होते. मात्र काही संघटनेने यास विरोध केल्याने डांबरीकरणाचे काम देण्यात आले. त्याचा फायदा घेऊन कंत्राटदाराने खड्डेमय रस्त्यावर फक्त गिट्टीमय डांबराचा सडा शिंपून रोडरोलर फिरवत आहे. याकडे मात्र संबंधीत अधिकारी मौनव्रत बाळगून आहेत.या महामार्गाबाबत अनेक तक्रारी झालेले असतांनासुध्दा मुजोर कंत्राटदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
           चंद्रपूर ते मुल हा महामार्ग अत्यंत वर्दळीच्या असून सावरकर चौकापासून तर एमईएल पर्यंत भर वस्तीचे स्थळ आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. तुटक्या-फुटक्या रस्त्यामुळे अनेकदा या ठिकाणी जीव घेण्या दुर्घटना झाल्या आहेत. या रस्त्याचे कंत्राट असणारे कंत्राटदार फक्त माल सुतावो अभियान राबवित आहे.याबाबतचे निवेदनही सादर कार्यालयांना देण्यात आले आहे. नियमांना डावलून होणाऱ्या चंद्रपूर मुल मार्गाच्या राष्ट्रीय महामार्गाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.


मार्च २०१९ मध्ये तत्कालीन collectorडॉ. कुणाल खेमणार यांनी कंत्राटदारांकडून संथगतीने काम केले जात असल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.शिवाय काम करीत असतांना निष्काळजीपणे काम करून कामा दरम्यान पाइपलाइन तोडणे, पथदिव्यांची पर्यायी व्यवस्था न करणे असे अनेक सार्वजनिक उपद्रवाचे प्रकार सुरू असल्याने national highway प्राधिकरण आणि कंत्राटदाराला फौजदारी नोटीस बजावली होती. यासंदर्भांत उत्तर ही मागीतले होते. मात्र मुजोर कंत्राटदारांनी कोणतेही उत्तर दिले नाही. एवढेच नाही तर प्रशासनाच्या सुनवानीलाही कंत्राटदार व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली नव्हती, त्यामुळे सीआरपीसी कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर कोव्हीडच्या प्रादुर्भावामुळे या महामार्गाच्या काॅक्रीटीकरणाकडे सर्वांनी दुर्लक्ष केले होते.त्याचाच फायदा घेत कंत्राटदारांनी फक्त वरवर खड्डे बुजवूण्याचे काम सुरू केले आहे. तत्कालीन व विद्यमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याने या महामार्गावर अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.यामुळे तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, व कंत्राटदारांकडून नुकसान भरपाई घेण्यात यावी असेही सांगितले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी केराची टोपली दाखवली. या महामार्गाचे नवीन डांबरीकरण कनिष्ठ दर्जाचे असल्याने डांबरीकरणाचे उच्च स्तरीय चौकशी करावी व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, संबंधीत कंत्राटदाराला काळा यादीत टाकून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन न केलेल्या करोडो रुपयांच्या नवीन डांबरीकरणाचे शिल्लक असलेले करोडो रुपये शासनाकडे जमा करून घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांनी केली आहे.