महापालीकेतील घोटाळा उघड केल्यास पालकमंत्री वडेट्टीवारांचा सत्कार



चंद्रपूर:-महानगरपालिकेतील घोटाळ्यांविरुद्ध ठोस कारवाई केल्यास जाहीर सत्कार करू काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी 'महानगरपालिकेतील घोटाळेबाजांना सोडणार नाही' असे वक्तव्य केल्याची माहिती प्रसिध्दी माध्यमातून प्राप्त झालेली आहे. ही माहिती खरी झाल्यास शहर विकास आघाडी तर्फे महानगरपालिकेतील घोटाळ्यांविरुद्ध ठोस कारवाई केल्यास पालकमंत्र्यांचे जाहीर सत्कार करू.तसेच त्यांनी घोटाळेबाजांविरुद्ध ठोस कारवाई करून दाखवावी असे आमचे खुले आव्हान आहे. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी मनपातील घोटाळ्यांविरुद्ध ठोस कारवाई केल्यास चंद्रपुर शहरात त्यांचा जंगी सत्कार करू असे सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये जाहीर पप्पू देशमुख यांनी केले.

महानगरपालिकेत करोडो रुपयांचे अनेक गंभीर घोटाळे पुराव्यानिशी उघडकीस आल्यानंतरही महानगर पालिकेतील घोटाळ्यांविरुद्ध पालकमंत्री यांचे स्तरावरून ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे 'देर आये दुरुस्त आये' असे म्हणून आम्ही पालकमंत्री यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. कचरा संकलन व वाहतुकीची निविदा रद्द करण्याचा आयुक्त राजेश मोहिते यांना पूर्ण अधिकार आहे.

महानगरपालिकेकडून वारंवार वाटाघाटीसाठी बोलवण्यात येऊ नये ही मे. स्वयंभू एजन्सीची मागणी मान्य करीत असल्याचे उच्च न्यायालयाने निकालांमध्ये नमूद केले. तसेच मुद्दा क्रमांक 12 मध्ये यापुढे निविदा प्रस्तावातील (RFP Request for proposal मधिल) अटी व शर्तीनुसार निविदा प्रक्रिया पुढे चालवावी असे निर्देश न्यायालयाने दिलेले आहे. एखाद्या निविदा प्रक्रियेमुळे किंवा कामामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्यास किंवा निविदा प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत असल्यास किंवा अन्य कोणतेही कारणाने व कोणत्याही वेळेस निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार महानगरपालिकेला असतो. अशा प्रकारची अट कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदा प्रस्तावामध्ये सुध्दा नमूद आहे. या अटीचा वापर करून आयुक्तांनी कचरा संकलन व वाहतुकीची निविदा रद्द करावी अशी शहर विकास आघाडीची मागणी आहे. निविदा प्रस्तावेच्या अटीमध्ये नमूद असल्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या महानगरपालिकेच्या अधिकारा मध्ये उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही हे सुस्पष्ट आहे. मात्र आयुक्त मोहिते कंत्राटदाराच्या सोयीने न्यायालयीन निकालाची अंमलबजावणी करून स्वयंभू एजन्सीला 40 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे असा शहर विकास आघाडीचा आरोप आहे.

तर राजेश मोहिते यांच्या खात्यातून नुकसानीची रक्कम वसूल करण्याची व त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करिता पाठपुरावा करणार, उच्च न्यायालयामध्ये व शासनाच्या चौकशी समितीसमोर आयुक्त राजेश मोहिते यांनी चुकीची माहिती सादर केली. याबाबत उद्या आम्ही गौप्यस्फोट करणार आहोत. आयुक्त मोहिते यांनी नियम 4. डावलून मे. स्वयंभू एजन्सीला काम देण्याचा प्रयत्न केल्यास महानगरपालिकेच्या संभाव्य नुकसानीची भरपाई त्यांच्या व्यक्तिगत खात्यातून वसूल करण्यासाठी व मोहिते यांचे विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार अशी माहिती सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख, नगरसेवक दिपक जयस्वाल, नगरसेविका मंगला आखरे, नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी दिली.