▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

आता प्रतीक्षा पहिल्या रुग्णाच्या अहवालाची, दुसऱ्याच्या संपर्कातील सर्व "निगेटिव्ह"!



चंद्रपूर (विशेष नोंद)
13 मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या रुग्णाच्या संपर्कातील 5 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 2 में रोजी कृष्णनगर येथे मिळालेल्या पहिल्या रुग्णाचे शुक्रवार दि. 15 में रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्या अहवालाची साऱ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे. चंद्रपुरात कृष्णनगर येथे पहिला रूग्ण मिळाल्यानंतर खळबळ माजली होती. परंतु त्यानंतर या परिसरातील रुग्णाच्या नातेवाईकाचे सर्व अहवाल निगेटिव आले, तद्नंतर सदर रुग्णाला नागपूर येथे अन्य तपासण्यासाठी पाठविण्यात आले, या रुग्णाची शुक्रवार दि. 15 मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या तपासणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले होते. महत्वाचे म्हणजे 13 मे रोजी यवतमाळ येथून आलेल्या रुग्णाचे नातेवाईक व त्याच्या जवळच्या संपर्कातील सर्वच नमुने आज "निगेटिव्ह" आल्यामुळे "कुठे चुकले" यावर वेगवेगळ्या तर्क-वितर्कांचे "कयास" लावण्यात येत आहे. चंद्रपुरात दुसरा रुग्ण हा यवतमाळ जिल्ह्यातून शहरात आला होता त्यानंतर लगेच त्यांना कोरोनटाईन ही करण्यात आले होते, तरीसूद्धा रूग्ण आणि त्याचे नातेवाईक संपर्कात आलेल्या सर्वांचीच तपासणी करण्यात येवून ते निगेटिव्ह आल्यामुळे चंद्रपूरकरांसाठी हे समाधानकारक असे वृत्त आहे. दुसरा रूग्ण आढळल्यानंतर रेड झोन किंवा बाहेरून आलेल्यांना विलगीकरण करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. चंद्रपूर मध्ये आज आलेल्या आकडेवारीनुसार 50 हजार पेक्षा जास्त बाहेरून आलेल्याची संख्या आहे, त्यांना योग्य निर्देश देऊन होम कोरोनटाईन ही करण्यात आले आहे परंतु अनेक ठिकाणी "होम-कोरोनटाईन" असलेले दिशा निर्देशांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे ज्यांना असे व्यक्ती बाहेर फिरतांना आढळतात त्यांनी आरोग्य विभागाला याची सूचना द्यावी, यानंतर अशा बेजबाबदारी करणाऱ्यांना दंड आकारला जाऊन त्यांचेवर गुन्हा ही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी प्रतिनिधींना दिली आहे. आता साऱ्यांना सावधगिरी बाळगायची असून लॉक डाऊन चा चौथा फेर 17 तारखेपासून पुन्हा लागू होईल. चंद्रपूर मध्ये सद्यस्थितीत वातावरण घाबरण्यासारखे नाही, परंतु सावधगिरी बाळगण्याची आता जास्त आवश्यकता असल्याची स्थिती आहे, त्यामुळे जबाबदार व जागरूक नागरिकांनी यासंदर्भात सतर्क राहून दिशा-निर्देशांचे पालन करावे, बाहेरून येणाऱ्या व बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची माहिती आरोग्य प्रशासनाला कळविण्याचे मोठे आव्हान ही आज सर्वांसमोर उभा आहे. 13 मे रोजी मिळालेल्या रूग्णामुळे चंद्रपूर मध्ये पुन्हा एकदा संचारबंदी कडक करण्यात आल्यामुळे चंद्रपूरकरांसाठी तणाव निर्माण करणारी होती.

संपूर्ण जिल्ह्याची आतापर्यंतची कोविड-१९ ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. आत्तापर्यंत स्वॅब नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ३०० आहे. यापैकी दोन नागरिक पॉझिटीव्ह निघाले असून २७२ नागरिक निगेटीव्ह आहे.२६ नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तालुकास्तरावर २१ ५ तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ११७असे एकूण ३३२ नागरिक संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गृह अलगीकरण करण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या व्यक्तींची संख्या ५७ हजार ८१४ एव्हढी आहे. यापैकी ४० हजार ६२ नागरीकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. १७ हजार ७५२ नागरिकांचे सध्या गृह अलगीकरण सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १३ मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सानिध्यातील अती जोखमीच्या ५ नातेवाईकांपैकी पाचही जणांचे स्वब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ मे रोजी पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण सध्या नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये बिनबा भागातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या अति जवळच्या कुटुंबातील व्यक्तींचे काल घेण्यात आलेले स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बिनबा गेट जवळ चंद्रपूर येथील एक महिला संक्रमित असल्याचे आढळून आले होते. सदरील रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. १३ मे रोजी या व्यक्तीच्या संपर्कातील पाच रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. या ५ लोकांचे प्रतिक्षेत असणारे स्वॅप नमुने सायंकाळी पाच वाजता निगेटिव्ह आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिले आहे.
बिनबा गेट परिसरातील नव्या रुग्णाच्या संपर्कातील दहा व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी ५ लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. बिनबा गेट परिसरातील रूग्ण देखील चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या परिसरातील एकूण १९० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याठिकाणी एकूण ७२८नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व माहिती घेण्यात येत आहे. तर २ मे रोजी आढळलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या संपर्कातील आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या ५५ नागरिकांच्या नमुन्यांपैकी ५३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. २ नमुने प्रतीक्षेत आहे. या परिसरातील २ हजार १५२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ८ हजार ५४० नागरिकांच्या प्रकृतीची तपासणी दोन तारखेपासून सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही गंभीर किंवा संशयित रुग्ण या परिसरात आढळलेला नाही.